महानिर्मितीमधील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित रास्त मागण्यांना तात्काळ मान्य करुन न्याय दयावा..

0
94

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांना शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांची निवेदनाद्वारे मागणी!

प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर :- महानिर्मिती पॉवर स्टेशन मधील राज्यातील सर्व विद्युत केंद्रामध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात आठ (८) दिवसापासून बेमुदत आमरण उपोषण सुरु असून देखील स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांच्या प्रलंबित रास्त प्रमुख मागण्यांना तात्काळ मान्य करुन कामगारांना न्याय देण्याची मागणी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फ़त दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व विद्युत केंद्रामध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात आठ (८) दिवसापासून सि. टी. पी. एस. मेजर गेट समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु असून उपोषणकर्ते कंत्राटी कामगार हेरमन जोसफ व संयुक्त कृती समिती पदाधिकाऱ्यांना आज शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या वतीने भेट दिली असता कंत्राटी कामगारांच्या एकूण नऊ प्रमुख मागण्या रास्त असून राज्याचे महायुती सरकार न्याय देणार ही कामगारांची अपेक्षा आहे.

कंत्राटी कामगारांना मिळत असलेल्या एकूण पगारात बेसिक, पूरक भत्ता १ एप्रिल २३ पासून ३०% वेतनात वाढ करून देणे सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना समान काम, समान वेतन देणे, मा. मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करून महानिर्मिती मधील सर्व कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार एन. एम. आर. च्या माध्यमातून देऊन नोकरीमध्ये सुरक्षा देवून महानिर्मिती कंपनी कोणत्याही कंत्राटी कामगाराला काढणार नाही असे परिपत्रक महानिर्मिती व्यवस्थापनाने त्वरित निर्गमित करणे. ई. एस. आय. ची वेतन मर्यादा ओलांडली असल्यामुळे ई. एस. आय. चा वैद्यकीय लाभ त्यांना मिळत नसल्याने अतिरिक्त लाभ म्हणुन मेडिक्लेम योजना सुरू करणे, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांबात नक्षलग्रस्त भत्ता लागू करणे.

नागपूर येथील दि. ९ मार्च २४ च्या उपमुख्यमंत्री मा. ना. फडणवीस यांचेशी चर्चेतील आश्वासन की, महानिर्मिती कंपनीच्या भरती परीक्षेत सेवेतील प्रत्येक ५ वर्षासाठी ५ गुण असे २५ गुण अतिरिक्त देवून ४५ वर्षाची वयोमर्यादा करणे, नवीन पद्धतीचा महानिर्मिती कंपनीचा लोगो व required by contractor नमुद असलेल्या गेट पास रद्द करुन जुन्या पद्धतीचाच गेट पास सुरू ठेवणे, खापरखेडा पॉवर स्टेशन मधील दिनांक ७ मार्च २४ या दिवशी गेटवरील संप आंदोलनात पोलिसांनी ज्या कंत्राटी कामगारांवर खोटे गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे त्वरित मागे घेणे.

तसेच महानिर्मितीमधील ऑटम वाईझ टेंडर व as an when required पद्धती रद्द करून लेबर कॉन्ट्रॅक्ट AMC पद्ध करावी तसेच प्रशासनाने ३ नोव्हेंबर २३ आणि २१ नोव्हेंबर २०२३ परिपत्रकानुसार १०% कमी इन्स्ट्रमेंट आणि लेबर कपात करण्यात येते. त्या मधून लेबर कपात हे वगळण्यात येवून त्वरित थांबवण्यात यावे. कंत्राटदारावरील पत्रकाचा गैर अर्थ काढून कामगारांना घरी बसवतात त्याचाच परिणाम दिनांक २८.७.२४ रोजी भुसावळ पॉवर स्टेशन मधील चेतन तायडे या कंत्राटी कामगाराला घरी बसवण्यात आल्याने अखेर बेरोजगारीमुळे उद्ध्वस्त होऊन चेतन तायडे या कंत्राटी कामगाराने आत्महत्या केली.

त्यामुळे सदर प्रमुख मागण्या मान्य करुन आपले सरकार कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि नेहमीच राहिल याची शाश्वती देवून कामगारांना न्याय देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली असता वैद्यकिय जिल्हा प्रमुख तथा वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान, वैद्यकिय जिल्हा प्रमुख तथा कामगार जिल्हा उपाध्यक्ष दिपक कामतवार व चंद्रपुर युवासेना महानगर प्रमुख दिपक रेड्डी यांची उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here