prabodhini news logo
Home चंद्रपूर प्रियदर्शिनी विद्यालय रामपूर येथे अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन

प्रियदर्शिनी विद्यालय रामपूर येथे अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन

0
148

प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर:- प्रियदर्शिनी विद्यालय रामपूर राजूरा येथे स्काऊटस् गाईडसच्या सामुदायिक विकास कार्यक्रमांतर्गत अंधश्रद्धा निर्मूलनावर आयोजित मा.पी. एम .जाधव यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. मनोज पावडे यांचे अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात पोस्टर्सच्या सहाय्याने सर्प विज्ञानावर सविस्तर माहिती जाधव यांनी दिली तसेच ढोंगी लोक दाखवित असलेल्या तथाकथित चमत्काराबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी तशाच प्रकारचे विज्ञान व हातचलाखीवर आधारित विविध चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरण करून त्यामागील वैज्ञानिक कारण जाधव यांनी स्पष्ट करून सांगितले तसेच गणितावर आधारित वाढदिवसाचा वार काढणे, 1 ते 10 वर आधारित स्पेलिंग कार्डचा चमत्कारिक प्रयोग विद्यार्थ्यांना शिकविण्यात आला. चमत्कार सादरीकरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ढोंगी लोकांच्या फसव्या आश्वासनाला बळी पडू नका असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक मनोज पावडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट शिक्षक नितीन ठाकरे यांनी केले व आभार प्रदर्शन राजेश वाघाये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र मांदे, ममता नंदुरकर यांनी सहकार्य केले असे देवराव कोंडेकर कार्याध्यक्ष महा अंनिस यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here