सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज, पुणे – प्रजासत्ताक अमृत गौरव समिती, महाराष्ट्र राज्य आयोजित पुरस्कार २०२४ कवयत्री सौ.माधुरी मंदरे यांना साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करणेत आला.
त्यांनी अल्पावधीत साहित्य क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय उंच भरारीची दखल घेऊन त्यांना साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार बहाल करण्यांत आला. तसेच त्यांनी केलेल्या मधुगंध या काव्य संग्रहाचे प्रकाशनही करण्यांत आले. खचाखच भरलेल्या नॅशनल लायब्ररी सभागृहात टाळ्यांच्या गजरात उत्तम प्रतिसादात हा कार्यक्रम साजरा झाला. या हुलावळे आयोजन व नियोजन इतके उत्कृष्ट होते की त्यामुळे या कार्यक्रमाने दुग्धशर्करा योगाप्रमाणे परिपुर्णतेचे उत्तुंग शिखर गाठले.
सदर कार्यक्रम मुंबई,वांद्रा पश्चिम, नॅशनल लायब्ररीच्या अलिशान सभागृहामध्ये २५ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी मा. बाळासाहेब तोरसेकर,मुंबई पद्मश्री जी.डी.यादव,लेखक,कवी, डाॅ. माळवेकर, मा. भानुदास केसरे, मा. प्रमोद महाडिक,मा. डाॅ. सुकृत खांडेकर, मा.डाॅ.नॅन्सी अल्बुकर्क, मा. राजेश कांबळे,मा.राधाकृष्ण कोळवणकर रेडिओ एंजल्स आदी मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करुन कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रम पार पाडणेसाठीचे श्रेय हुलावळे सर यांना जाते. त्यांनी या कार्यक्रमासाठी अतोनात परिश्रम घेतले.

