प्रेम हे ऋणानुबंध जपणारे असावे
नाण्यासारखे खणखणीत वाजावे
हृदयापासून खरे जपणारे असावे
मोडणारा संसार वाचविणारे दिसावे
प्रेम घासातला घास देणारे असावे
स्वार्थ साधण्यापुरते कधीच नसावे
एकमेकांचा जीव समजणारे असावे
संकटात नेहमी साथ देणारे असावे
आयुष्यात खरे साथीदार असावे
विश्वासाला मनापासून पात्र असावे
जगण्यात एक आनंद देणारे असावे
दु:खात संघर्ष करणारे वादळ असावे
पाण्यासारखे अतूट, निर्मळ असावे
मायेचा जिव्हाळा लावणारे असावे
जीवनात कायम चैतन्य देणारे असावे
प्रेम हे जीवनातले जीवंत छत्र असावे
प्रेम जगण्यातली सावली असावे
तप्त संसारात गारवा देणारे असावे
जीवनातले भक्कम आधारअसावे
आयुष्यभर निभावणारे वचन असावे
प्रेमाची नाती जपावी कायमची
कवियत्री ऋतुजा आहिरे
पुण्यश्लोक अहिल्यानगर

