कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याप्रमाणे उमेद,विश्वास व कष्ट हे ज्याच्याजवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. यादृषकोनातुन मुख्यमंत्री वयोश्री योजना हि मा श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जेष्ठ नागरिकासाठि आणली असता जेष्ठ नागरिकांना खुप आनंद झाला वयोश्री हि योजना समजताच सामाजिक कार्यकर्त्या सौ रेणुताई पोवार यांनी ज्या ज्या जेष्ठ नागरिकांना आधार नाहि ज्यांना मुलं नाहित ज्यांना या योजनेची गरज आहे ज्याची परिस्थिती नाहि अशा जेष्ठ नागरिकासाठि घरोघरी जाऊन , खेडोपाडी जाऊन, गावोगावी जाऊन ,जेष्ठ नागरीकांचे फार्म भरून सहकार्य केले ते फार्म कोल्हापूर जिल्हा सहाय्यक आयुक्त सो सामाजिक विशेष सहाय्यक विभागाकडे देऊन त्यांची पोच घेऊन ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, सर्व सामान्य नागरिक यांच्याकडे देऊन सहकार्य केले अशा वेळि या वयोश्री योजने बद्ल माहिती घेताना कोल्हापूर सहाय्यक आयुक्त सो साळी साहेब , समाजकल्याण अधिक्षक सचिन पाटिल साहेब, समाजकल्याणच्या शेंडे मॅडम यांनी चांगल्या प्रकारे माहिती देऊन व जेष्ठ नागरिकांना वैवस्थीत माहिती सांगुन फार्म भरण्यास सहकार्य केले याची पोच पावती म्हणुन सामाजिक कार्यकर्त्या सौ रेणुताई पोवार, सामाजिक कार्यकर्त श्री किसनराव खोत साहेब, पत्रकार अजित साळोखे,माजी सरपंच अक्का कुंभार, कार्यकर्ते महादेव पाटिल, आतंरराष्ट्रीय मानव अधिकार अध्यक्ष सौ रोजाना आंबी,अध्यक्ष मधुकर शिंदे, अर्जुन पोवार या सर्वांनी कोल्हापूर जिल्हा समाजकल्याण सहाय्यक आयुक्त साळी साहेब, अधिक्षक सचिन पाटिल यांना श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्हा समाजकल्याण स्टापचा प्रतीसाद चांगला मिळाला व वयोश्री योजना चांगल्या प्रकारे राबविण्यात आली.

