सदलगा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- सदलगा शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील 108 वर्षाची सहकार क्षेत्राची परंपरा लाभलेल्या संस्थेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
प्रारंभी दीप प्रज्वलन व किसान गौरव गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर संस्थेचे सचिव बाळासाहेब बाकळे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून अहवाल वाचन केले. संस्थेचा कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी संस्थेला 38 लाख 86 हजार 111 रुपये इतका नफा झाला असून सभासदांना 10% लाभांश जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या आर्थिक वर्षात संस्थेचे 2478 सभासद संख्या असून संस्थेचे भाग भांडवल 1 कोटी 39 लाख इतके असून निधी चार कोटी १८ लाख तर ठेवी 28 कोटीच्या वर असून गुंतवणूक 13 कोटी 27 लाख आहे. कर्ज वसुली 98.5% झाली असून संस्थेला ‘अ’ वर्ग ऑडिट प्रमाणपत्र मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
सभासदांमधून अनुभवी संस्थेचे माजी संचालककल्लप्पा कमते यांनी संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला आणि याच पद्धतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सभासद व ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी संस्थेने पुरविलेल्या सुविधा, पॅन कार्ड, विमा, वैद्यकीय सुविधा, आणि शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या सर्व शेती विषयक सुविधा याविषयी सविस्तर माहिती कथन करून अध्यक्ष व संचालक मंडळ आणि संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. व संस्थेच्या प्रगतीपथाच्या दीर्घ इतिहासाचा आढावा घेतला.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली संस्था कोणत्या पद्धतीने पारदर्शी व्यवहार करीत असून शेतकरी व सामान्य जनता यांच्या हितासाठी बांधील असून सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्था प्रयत्न करील याची मी ग्वाही देतो असे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 80 टक्के च्या वर गुण प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पत्रकार तात्यासाहेब कदम, मकरंद द्रविड, प्रतीक कदम, शिवपुत्र मरजक्के, राजू गडकरी इत्यादी मान्यवरासह संस्थेचे शेकडो सभासद, स्त्री पुरुष, कर्मचारी व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

