लागवडी विषयी मार्गदर्शनात बहुसंख्य विद्यार्थ्यांचा सहभाग
उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादीका प्रबोधिनी न्युज 9921400542 – अचलपुर: जगदंब महाविद्यालयात राज्यस्तरीय मायक्रोग्रीन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली सोबतच वनस्पतीशाश्त्र विभागाने विद्यार्थ्यांसाठी हा आगळा वेगळा उपक्रम राबवून त्यांना मिक्रोग्रीन चे धडे दिले. कार्यक्रमाला डॉ. सुचिवता खोडके यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. जी. खापेकर यांनी तर परिचय प्रा. व्ही. पी. देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे सहसचिव एस. ओ. मुगल तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. एम. कोहळे हे होते. कार्यक्रमाच्या यशश्वीतेकरिता वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. जी. खापेकर, डॉ. प्रा. व्ही. पी. देशमुख, प्रा. अभिजीत पाखरे. सविता देशभ्रतार, काजल भोरे, शिवानी सरोदे, संदीप रावेकर, इत्यादींनी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमाची सांगता अखेर राष्ट्रगीताने करण्यात आले….

