प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – मारुती सुझुकीचे मॅनेजर अनिल बोडके यांनी आयोजित केलेल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रम दिनांक ०८ ऑगस्ट २०२४ ला आयोजित केला होता.यामध्ये दौंड जिल्हा पुणे येथील संगिता विजय भालेराव यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राहुल कुल आणि त्यांची सुविद्या पत्नी सौ.कांचन कुल यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. टाटा मारुती सुझुकी दौंड तालुक्यातील शाखेने सर्वात मोठा आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित केला होता.
संगिता विजय भालेराव या साहित्यिका असून त्यांना आतापर्यंत ऑनलाईन स्पर्धेत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.विशेष म्हणजे त्यांचा आनंदघन हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचे रघुनाथ वाडेकर,सुनिता खंदीझोड, सुनिता जाधव , विद्या वाघ , शुभांगी धुमाळ , मुक्ता पंडित, स्वाती राजे , विजय भालेराव,सृष्टी भालेराव ,प्रा.नानाजी रामटेके आरमोरी गडचिरोली आदींनी अभिनंदन केले असून या बहुमान पुरस्काराबद्दल त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.

