भाद्रपद चतुर्थीला
आगमन तुझे होते
विघ्नहर्ता गजानन
जग आनंदुन जाते.
पार्वतीचा गणपती,
चराचरात बसला.
माझ्या मनमंदिरात
किती शोभुन दिसला.
पार्वती गेली स्नानाला,
ठेवीले तुला रक्षणार्थ.
शंकर आले जवळी
कळला नाहीच अर्थ.
कोण तु का उभा इथे,
राग अनावर झाला,
मान तुझी उडवली
रक्तबंबाळ तु झाला.
पार्वती माता कोपली
उग्र रुप धरीयेले,
पाहुनी ते भयंकर
शंकर देव नमले.
पहीला प्राणी मिळाला,
गजराज महाकाय,
आणले त्यांचे मुंडके
झालै तुम्ही गणराय.
अशी आहे आख्यायिका
पुरातन काळातली,
जन्म तुमचा चतुर्थी
आहे भाद्रपदातली.
कवयित्री सौ. सुनंदा वाळुंज
ठाणे

