prabodhini news logo
Home अकोला सम्राट अशोक सेनेकडून भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या विविध मागण्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन

सम्राट अशोक सेनेकडून भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या विविध मागण्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन

0
180

मागण्या मान्य नाही झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार

अकोला प्रतिनिधी:- भीमा गोरेगाव शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभाचा वरचा भाग खाली कोसळल्यामुळे पावसाळ्यात विजयस्तंभ मधून पाणी गळत आहे.आणि भीमा कोरेगाव च्या १९१८ च्या दंगल मध्ये तीन हजार कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच विजय स्तंभाला जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात यावा .
भीमा कोरेगाव विजयस्थंभावर मागील ११ वर्षापूर्वी वीज कोसळली होती. व विजय स्तंभाचा वरील भाग खाली कोसळला होता. तो भाग त्या वेळी दुरुस्त केला गेला पण त्याच भागातून दरवर्षी पावसाळ्यात विजय स्तंभाच्या चे वरील भागातून पाणी विजयस्तंभ मध्ये जाऊन सर्व बाजूने पावसाचे पाणी बाहेर पडू लागले आहे व आज विजय स्तंभ फुगलेल्या अवस्थेत दिसतो आहे. ही परिस्थिती अशीच स्तंभावर राहिली तर कुठल्याही क्षणी दुर्घटना घडू शकते. म्हणून विजय स्तंभाची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी..१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल व ३ जानेवारी २०१८ रोजी चे भारत बंद वेळी आपल्या अंदाजे तीन हजार कार्यकर्ते वर गुन्हे दाखल झालेले हे सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समिती स्थापन केली होती. मात्र अजूनही गुन्हे मागे घेतले गेले नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षणात व नोकरीत अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. तरी ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे..

१ जानेवारी २०११ रोजी अजित दादा पवार यांनी प्रथमच विजय स्तंभ या ठिकाणी मानवंदना दिली व विजयस्तंभ विकास कामा साठी १०० कोटी रुपयाची घोषणा केली होती.ती रक्कम अजून ही जिल्हाधिकारी पुणे यांचे कडे वर्ग करण्यात आली नाही. ती रक्कम त्वरित वर्ग करण्यात यावी व विजय स्तंभ शेजारील खाजगी जमीन अधिग्रहण करण्यात यावी..
१ जानेवारी २०१८ पासून शौर्य दिन नियोजनासाठी बार्टी चे माध्यमातून अंदाजे १० कोटी रुपये खर्च करण्यात येतो. तो निधी बार्टीच्या माध्यमातून खर्च न करता १ जानेवारी शौर्य दिना साठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी..
विजयस्तंभ व छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळे पुणे दर्शन मध्ये समाविष्ट करण्यात यावे. शासनाच्या वतीने विजय स्तंभ या ठिकाणी एतिहासिक फलक लावण्यात यावा.
विजय स्तंभावर १९७१ चे युद्धातील सैनिकांची काळी पाटी लावण्यात आली आहे.ती त्वरित काढून दुसऱ्या ठीकानी मान सन्मानाने लावण्यात यावी.
विजय स्तंभ या ठिकाणी देशभरातून भीम सैनिक येत असतात,त्यांच्या साठी पुणे स्टेशन ते विजय स्तंभ अशी स्वतंत्र बस सोडण्यात याव्यात व येणाऱ्या लोकांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करण्यात यावी.तसेच पार्किंग साठी शासकीय जागेवर आरक्षण टाकण्यात यावं या विविध मागणी करिता केंद्रीय मंत्री , बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव, अमरावती चें खासदार बळवंतभाऊ वानखेडे,अकोला जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांचेमार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आज ९सप्टेंबर २०२४ रोजी सम्राट अशोक सेनेकडून निवेदन देण्यात आले . आमच्या मागण्यात पूर्ण नाही झाल्यास महाराष्ट्रभर निळा जन्म उठा मोर्चा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आलाय.
या वेळी निवेदनावर सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य.आकाश शिरसाट, यांचेसह,गौतम भाऊगवई ,सनी भाऊ मृदुंगे अक्षय भाऊ कोकणे सागर भाऊ इंगळे, सिद्धू मेश्राम ,नक्षन शिरसाट ,अनिकेत इंगळे प्रकाश मेश्राम,आदर्श इंगळे गोलू शिरसाट आदी अनेक सामाजिक कार्यकर्तेच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here