नागपूर प्रतिनिधी – दिनांक 12.9.2024 आज दि 12/9/2024 रोजी आम आदमी पार्टी महाराष्ट्र ने महाजेनको ने एम एस एम सी च्या नाकारलेल्या कोळशाबाबत एम एस एम सी चे महाव्यवस्थापक माननीय पी वाइ टेंभरे यांना निवेदन दिले. हे निवेदन देत असताना प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, राज्य नेते सुनील वडस्कर, नागपूर जिल्हा अध्यक्ष ऋषभ वानखेडे, नागपूर शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे व त्याचबरोबर अनेक कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.
महाजेनको च्या निविदानुसार एम एस एम सी ने महाजेनकोला कोळसा वॉशरीच्या माध्यमातून कोळसा धून पुरवावा असे नमूद केलेले आहे. डब्ल्यूसीएल कडून आलेला हा कोळसा वॉशरी धुण्याची प्रक्रिया करून एम एस एम सी च्या माध्यमातून महाजेनको ला पुरवते. ह्या पुरवलेल्या कोळश्या मधील काही कोळसा निकृष्ट दर्जाचा आहे या कारणाखाली नाकारल्या जातो. या नाकारलेल्या कोळशाबद्दल खालील प्रमाणे आम आदमी पार्टीने एम एस एम सी ला माहिती मागितली.
1. ह्या नाकारलेल्या कोळशाची सखल उष्मांक मूल्य (gross calorific value) किती ?
2. हा नकारलेला कोळसा कोणत्या शेवटच्या उपभोक्त्याना विकण्या आला याची 2019 पासून आज पर्यंत ची यादी देण्यात यावी.
3. निविदेच्या अटीनुसार नाकारलेला कोळसा थेट शेवटच्या उपभोक्त्याकडे वॉशरीच्या माध्यमातून विकल्या जाईल, तरी महोदय आपणास विनंती आहे की ह्या वॉशिरीज च्या माध्यमातून शेवटच्या उपभोक्त्या ला दिलेले कोळशाचे खरेदी मागणी (purchase order) पत्र याच्या 2019 ते आज पर्यंतच्या प्रती देण्यात याव्या.
आम आदमी पार्टीने हा मुद्दा रेटून धरायचं ठरवलेला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ह्या नाकारलेल्या कोळशाचा सखलभार हा वीज उत्पादनाच्या खर्चावर पडतो. त्यामुळे सरासरी वीज उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचाच परिणाम स्वरूपात देशातील सगळ्यात महाग वीज महाराष्ट्रात उपभोग त्यांचा खिसा रिकामा करते.

