ब्रम्हपुरी कुणबी समाज संघर्ष समिती यांनी घेतली चौगान येथील मृतकाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

0
227

16 सप्टेंबरला दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी – पाऊसापासून संरक्षणासाठी डिजेवर झाकलेली फारी टेम्पोच्या चाकावर चढून काढत असताना निखिल बाबुराव मैंद याचा अचानक पाय घसरल्याने डोक्याच्या भारावर खाली पडून मृत्युमुखी झाल्याची घटना सोमवार दि. 16 सप्टेंबरला रात्रौ 9 वाजता दरम्यान ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान येथे घडली होती. याची माहिती मिळताच कुणबी समाज संघर्ष समिती ब्रम्हपुरीच्या पदाधिकारी यांनी चौगान येथील मृतकाच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन करत आर्थिक मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल मैंद यांच्या मोठ्या वडिलांच्या घरी गणपतीचे विसर्जन असल्याने गावकरी मंडळी यांचे जेवण सुरू होते. गावात हलका पाऊस सुरू असल्याने विसर्जनासाठी मिनी टेम्पो वाहनावर तयार करण्यात आलेल्या डीजे साऊंड सिस्टीमवर फारी झाकण्यात आली होती. लोकांचे जेवण संपत आले होते व पाऊस बंद झाले असल्याने गणपती बाप्पाची आरती लावायची आहे म्हणून डिजेवर झाकलेली फारी काढत असताना गाडीचे चाक ओले असल्याने निखिल याचा पाय घसरल्याने तो डोक्याच्या भारावर खाली पडून गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला तात्काळ ब्रम्हपुरी येथिल सरकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. निखिल बाबुराव मैंद हा अतिशय मेहनती आणि कर्तव्यदक्ष युवक म्हणून ओळखला जात होता. मागील दोन वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. तो घरातील कर्ता पुरुष असल्याने त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच कुणबी समाज संघर्ष समिती ब्रम्हपुरीच्या पदाधिकारी यांनी चौगान येथील मृतकाच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन करत आर्थिक मदत केली.
या प्रसंगी अखिल कुणबी समाज संघर्ष समितीचे क्रिष्णा सहारे, अविनाश राऊत, प्रेमलाल धोटे, नानाजी तुपट, प्रकाश धोटे, योगेश राऊत, अनिरुद्ध ढोरे, नोगेश बगमारे, जगदीश तलमले, सरपंच उमेश धोटे, उपसरपंच अंकुश मातेरे, मनोज वझाडे, सिद्धेश्वर भर्रे, अनिल दोनाडकर, जयपाल पारधी, पत्रकार राहुल भोयर, पत्रकार संतोष पिलारे, भगवान प्रधान, गणेश पिलारे, दिगांबर मैंद यांच्या सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here