अहमदपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – अहमदपूर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी न्यायासाठी अदिवासी, ८५ वर्ष वयाच्या वयोवृद्ध, विधवा महिला रूक्मीणबाई महादू कार्लेवाड रा. गुंजोटी यांचे तहसीलदार अहमदपूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झाले होते, मात्र दुसऱ्या दिवशी तहसीलदार पांगरकर यांनी संबंधित प्रश्नाबाबत लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे व अन्य पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन आमरण उपोषणास बसलेल्या रुक्मीनबाई यांना तहसीलदार पांगरकर मॅडम यांनी लिंबू सरबत देऊन उपोषण सोडले.
याप्रसंगी नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर, लोकाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकरराव शेळके, लोकाधिकार संघाचे लातूर जिल्हा उपप्रमुख लिंबाजी हजारे, लोकाधिकार संघाचे अहमदपूर तालुकाप्रमुख विठ्ठलराव तरडे, लोकाधिकार संघाचे अहमदपूर शहर प्रमुख प्राचार्य अशोकराव पेद्देवाड, हनुमंत अंगद मामीलवाड, नांदेड संस्थापक अध्यक्ष, आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटना, लक्ष्मण पेठकर चापोली, गजानन चांदेवाड सरपंच रूद्धा, पांडुरंग धडे सरपंच जढाळा, धोंडीराम रद्देवाड परचंडा, हरिभक्त परायण नवनाथ महाराज भानगिरे, किशोर काळवणे, दयानंद ईगे, संतोष बुजारे, जनार्दन गायकवाड, ओमकार गंगथडे उन्नी, चंद्रकांत कोलपुसे साळंकवाडी, आयोध्या भोपळे उजळंब, रंजना चंद्रकांत कोलपुसे, अंजना नवनाथ भानगिरे आदी उपस्थित होते.
आमरण उपोषणाच्या पहिल्याच दिवशी अहमदपूरचे माजी आमदार विनायकराव पाटील यांनी उपोषण स्थळी येऊन रूक्मीणबाई महादू कार्लेवाड यांना भेट दिली होती. तसेच अनेक मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला होता.

