प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – विशाल क्रांती न्यूज चे तसेच विशाल क्रांती साप्ताहिक चे संपादक आप्पासाहेब भोसले यांना नुकताच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार 2024 नुकताच जाहीर झाला आहे आप्पासाहेब भोसले अनेक वर्षे अतिशय प्रामाणिकपणे पत्रकारिता करत असून समाजातील अनेक प्रश्नांना योग्य न्याय मिळाला पाहिजे या हेतूने पत्रकारिता माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे इतक्यावरच न थांबता त्यांनी स्वतः विशाल क्रांती न्यूज आणि विशाल क्रांती साप्ताहिक च्या माध्यमातून अनेक तरुणांना पत्रकारिता करण्यासाठी मार्गदर्शन करत असून अनेकांना या प्रवाहात आणले आहे त्यांच्या न्यूज च्या माध्यमातून अनेक अतिशय चांगल्या बातम्या सामाजिक प्रश्न मान्यवरांचा सन्मान विधायक कामे त्यांनी केले आहेत त्यांच्या ह्या प्रामाणिक कामाची पोचपावती म्हणजेच त्यांना जाहीर झालेला हा राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार म्हणावा लागेल एखादं चॅनल अथवा एखाद साप्ताहिक चालवणे हे आता साधी गोष्ट राहिलेली नाही तरी देखील स्वकष्टातून अनेकांना जवळ करून अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हे चॅनल आणि साप्ताहिक सुरू केले त्यांच्या बुद्धी कौशल्याचे हे वैशिष्टच म्हणावे लागेल एक प्रामाणिक माणूस समाजात काम करताना समाजाने त्यांना जवळ करावं अनेक प्रश्न त्यांच्याजवळ उपस्थित करताना तिथे आपल्याला न्याय नक्की मिळेल असा विश्वास दाखवणे म्हणजेच आप्पासाहेब भोसले साहेब आज त्यांना जाहीर झालेला पुरस्कार भविष्यात देखील उत्तुंग भरारी घेईल असे म्हणणे वावगे ठरणार नाही असे वाटते साहेब तुमचे प्रामाणिक काम सर्वांनाच भविष्यात मोठा उत्साह आणि विवेक बुद्धी भविष्यात अनेकांना काम करण्याची संधी देवो हीच शुभेच्छा आणि सदिच्छा..!अख्तर मकानदार अब्दुललाट.

