जाणी वॉर्ड येथील गणपती बाप्पाच्या गोपालकाल्याचे आयोजन

0
23

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांची विशेष उपस्थिती

ब्रह्मपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – शहरातील जाणी वॉर्ड येथील मंदिरामध्ये तरुन गणेश मंडळाच्या वतीने गणेश चतुर्थीला गणेश भक्तानी मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली होती. गणेशोत्सवाचे महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे लोकांमध्ये एकतेचा संदेश देतात. हा सण लोकांमध्ये भक्ती, आनंद आणि उत्साह निर्माण करतो. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसाच्या काळात गणेश भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाची आराधना केली.
अनंत चतुर्थीला तरुन गणेश मंडळ जाणी वॉर्ड, ब्रह्मपुरी यांच्या वतीने गणपती बाप्पाच्या गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी माजी जि.प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर प्रामुख्याने उपस्थित होते. माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून गोपालकाल्याचा सोहळा पार पडला.
यावेळी उत्तम उरकुडु,दत्तत्रय दलाल,तमय देशकर, निखिल प्रधान,बाला धोटे,परमानंद प्रधान, गोकुल प्रधान,राजेश पिलारे,आशिष प्रधान,अतुल दुपारे,अमोल बगमारे,राहुल सुभेदार,तथा तरुन गणेश मंडळ जाणी वार्ड ब्रम्हपुरी सर्व सदस्य गण यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक जनता उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here