मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान वाटप

0
269

सामाजिक कार्यकर्ते गजानन वनगुजरे धारासुरकर यांनी उपक्रम राबवल्या बद्दल यांचा सत्कार

परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने परभणी येथील सुप्रसिद्ध खिचडी वाले गुरुजी यांच्या राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय सरकारी दवाखाना परभणी येथे बळीराजामित्र सामाजिक कार्यकर्ते शासकीय गुत्तेदार गजानन वनगुजरे पाटील धारासुरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अनुषंगाने आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात परभणी शहर सर्व बंद सर्व हॉटेल बंद सर्व बंद असल्यामुळे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ बंद पुकारला होता त्यामुळे रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना खाण्यापिण्याच्या सोय होय कमी होऊ नये म्हणून रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत खिचडी व अन्नदान वाटप करण्यात आले या अन्नदानाचे यजमान राष्ट्रजन फाउंडेशन कोषाध्यक्ष गजानन वनगुजरे यांच्यावतीने मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गोसंवर्धन गोशाळा पशु निवारण केंद्र चे अध्यक्ष विजय जोगदंड खिस्ते पाटील ताडबोरगावकर कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय स्वच्छता दूत कावळे मामा कार्यक्रमाचे संयोजक तथा प्रमुख पाहुणे राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालयाचे संस्थापक अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पौढे गुरुजी कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा गौरक्षक सेना अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्यावतीने गजानन वनगुजरे कावळे मामा गोसेवक विजय खिस्ते पाटील पौढे गुरुजी यांचा गाईची मूर्ती हार शाल श्रीफळ पुस्तक देऊन सत्कार व गौरव करण्यात आला कार्यक्रमाची व्यवस्थापक राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालयाचे व्यवस्थापक अशोक लोंढे या आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी या ठिकाणी सकाळी आठ वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्वच्छता दूत कावळे मामाच्या वतीने आणि सरकारी दवाखाना येथे साडेआठ वाजता रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान खिचडी महाप्रसाद व सत्कार समारंभ आणि धार्मिक कार्यक्रमातून संदेश प्रत्येकाने आपण आपला वाढदिवस जयंती व इतर यांच्या समाजाच्या समर्थनार्थ मोफत अन्नदान व रुग्णांना रुग्णांना सहकार्य करा असे आव्हान या कार्यक्रमातून करण्यात आले अशी माहिती गौरक्षक सेना अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here