आज आपण देश भर विपक्ष वर पडत असलेल्या सीबीआय ईडी च्या कार्यवाही का बर येवढ्या वेगवान झाल्या ? का बर सरकार मधे बसलेल्या भाजपाच्या एकही आमदार खासदार मंत्री वरती सीबीआय ईडी ची एक पण कार्यवाही होतांना का बर दिसत नाही ??? म्हणजे सर्व फक्त विपक्ष ला सोडून संपूर्ण भाजपा दुधाप्रमाने पूर्णपने स्वच्छ भ्रष्टाचार मुक्त आहे. मग भाजपचे नेते जर येवढे च शुद्ध आहे तर प्रत्येक राज्यामध्ये भाजपकडे ऑपरेशन लोटस करण्यासाठी फंडींग कुठून व कशी येत आहे. कित्तेक करोड पैसे देऊन आज पर्यंत विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांना कस विकत घेणे असे जमले भाजपा ला ??? इलेक्ट्रॉल बाँड च्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून करोडो रुपये घेतले तर कश्या पद्धतीने करोड रू घेतले याचावर कधी भाजपला या 10 वर्षामध्ये एक तरी नोटीस किंवा एक तरी कार्यवाही केली का सीबीआय एडी ने ? का बर नाही केली याच पूर्ण उत्तर तयार आहे आम्हा वैचारिक लोकांकडे कारण भाजपाच्या या भ्रष्टाचाराच्या भस्मासुरात भाजपच शस्त्र म्हणून काम करत आहे सीबीआय ईडी. जी स्वतः एक भाजपला सुरक्षा देणारे कवच बनते तर ते भाजपा वरच योग्य ती कार्यवाही कशी करेल ही खरी चित्रपटाच्या मागची खरी पार्श्वभूमी आहे. कोणत्याही देशाची केंद्रीय सुरक्षा एजेन्सी कशासाठी असते सरकारच्या काळया कामावर लक्ष ठेऊन त्यावर योग्य कार्यवाही करून सरकारचे पितळ बाहेर काढण्याचं काम करते. पण आज आपण आपल्या देशातील सरकारी एजन्सी पूर्णपणे सरकारच्या चमचा, सरकारचा सेवक म्हणून काम करत आहे . जर केंद्रीय सुरक्षा एजन्सी स्वतंत्रपणे कामे करत नसतील सरकारच्या दावणीला बांधलेल्या असतील मग देशाच्या सुरक्षेचा प्रश्न तर आज भगवान भरोसे चालत आहे असे पूर्णपणे दिसून पडते. याच जर संस्था सरकारच्या बाजूने हातात हात टाकून( तुम्ही आमची बाजू झाका आम्ही तुमची झाकतो) असे कार्य सद्ध्याचा परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे या सुरक्षा यंत्रनांच काम आज भगवान भरोसे आणि विपक्ष भरोसे सुरू आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टा ने सुद्धा यावेळी आम् आदमी पार्टी चे संस्थापक अध्यक्ष केजरीवाल साहेब यांच्यावर च्या कोणताही पुरावा नसलेला तथाकथित दारू घोटाळ्याबाबत बोलतांना सुरक्षा यंत्रनांना बजावून सांगितले की” सरकारच्या पिंजऱ्यातील पोपट/गुलाम बनून काम करण्यापेक्षा स्वतंत्रपने काम केले तर तुम्हाला खऱ्या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करता येईल “. म्हणजे सुरक्षा यंत्रांनाना सरकार ची मित्रता एवढी जवळची झाली का त्यांच मुख्य कार्य काय असते याचा नेमका त्यांना विसर होतांना हे सरळ सरळ सर्व देशातील नागरिकांना तसेच बाहेर देशातील नागरिकांना सुद्धा दिसत आहे हे नक्की आहे. याच यंत्रणांचा भरोष्यावर काही राज्यांतील सरकार सुद्धा या केंद्र सरकार ला बदलवून आपले स्वतःचे भाजप समर्थित राज्य सरकार बसवले. मग या सुरक्षा यंत्रनाचा गैरवापर अजून किती काळ हे भाजप सरकार करणार आहे.यांच्या साहाय्याने किती वर्ष जोडतोड ची फसवाफसवी ची राजनीती सुरू ठेवणार आहे हे केंद्र सरकारसरकार .ज्या पद्धतीने मांजर डोळे लाऊन कुणाला माहिती नाही होत आहे अश्या पद्धतीने दूध पित असते त्या पद्धतीने या सरकार तसेच यांची पाठरक्षण करणाऱ्या यंत्रणाच झाल आहे . दिल्लीतील तथाकथित बनावट दारू घोटाल्या मधे सरकारच्या म्हणण्यावरून सुरक्षा यंत्रणांनी दबाव टाकून 150 ते 200 साक्षीदार ,ज्यामधे जास्तीत जास्त व्यापारी होते त्यांचा हातून एक पण योग्य तो आरोप सिद्ध करणारा पुरावा अवगत नाही झाला.यावरून फक्त या यंत्रणाच एकच लक्ष दिसते विपक्ष च्या नेत्यांचा अमूल्य वेळ कसा घालवायचा, विपक्ष ला समोर येऊ न देणे, मजबूत होऊ न देणे आणि नागरिकांपर्यंत सत्य पोहोचू न देणे . आता तुम्हीच बघा खरा घोटाळा कोण करत आहे नागरिकांनो,अशी विकल्या गेलेली सुरक्षा यंत्रणा राहील तर मग तुमच्या समोर या सरकार मधे बसलेल्या नेत्यांचा घोटाळा समोर येईल का ????? तुम्हीच याचा अनुमान लावा कारण सुरक्षा यंत्रणांचे मुख्य अधिकारीच अमित शहा व प्रधानमंत्री मोदी यांनी यांच्या पाठरक्षण साठी बसवल्या आहेत. कारण या अधिकाऱ्यांनीच त्यांचा गुजरात मधील गोध्रा हत्याकांडा मधे या दोघांना पण पुरावे मिळून सुद्धा बाइज्जत बरी ( clean cheat) दिली होती. आता कळलं तुम्हाला चोर चोर मौसेरे भाई कोणाला म्हणतात ते.जर तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा आणि जागृती पसरवा..
लेखक सोनाल पाटील

