prabodhini news logo
Home ठळक बातम्या जवाहर फाउंडेशनमध्ये जबड्याची शस्त्रक्रीया यशस्वी गुटखा खाणे टाळावे- डॉ.ममता पाटील

जवाहर फाउंडेशनमध्ये जबड्याची शस्त्रक्रीया यशस्वी गुटखा खाणे टाळावे- डॉ.ममता पाटील

0
631

सतिष पवार जिल्हा प्रतिनिधी धुळे ९५२७७९९३०४ – धुळे आज दिनांक:- २३/०९/२०२४ – गुटख्याच्या अतिसेवनामुळे रुग्णाचा जबडा आणि तोंड पूर्णपणे बंद झाल्याने त्यास अन्नपाणी ग्रहण करण्यास अडचणी येत होत्या परिणामी रुग्णाची प्रकृती दिवसेदिवस खालावली होती. या रुग्णांच्या जबड्याची जवाहर मेडीकल फाउंडेशनचे डेंटल कॉलेज व हॉस्पीटल येथील तज्ञ डॉक्टरांनी यशस्वीपणे शस्त्रक्रीया केली. दरम्यान गुटखा खाणे हे विविध जीवघेण्या आजारांना निमंत्रण देण्यासारखे असून गुटखा खाणे टाळणे आवश्यक असल्याचे सचिव डॉ.ममताताई पाटील यांनी सांगितले आहे.गुटखा खाण्याचे प्रमाण वाढल्याने तोंड,जबड्यासह विविध आजारांमध्ये वाढ झाली आहे. परीणामी रुग्णांच्या प्रकृतीवर त्यांचा दुष्परीणाम होत आहे. गुटख्याच्या अतिसेवनाने धुळे तालुक्यातील एका रुग्णाचे तोंड आणि जबडा पूर्णपणे बंद झाला होता. तोंड उघडत नसल्याने रोजचे जेवण करणे,पाणी पितांना त्या रुग्णास प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे रुग्णांची शरीर प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. जबड्यावरील उपचारासाठी सदर रुग्णांवर मुंबई येथील महागडी रुग्णालयात शस्त्रक्रीया करण्यात आली. मात्र या शस्त्रक्रीयेनंतरही त्या रुग्णाचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे अखेर त्यांच्या कुटूंबियांनी जवाहर मेडीकल फाउंडेशन येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करुन पुढील उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ओएमफ विभाग प्रमुख व तज्ञ डॉ. शरन बसप्पा यांनी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या व तपासण्या करुन घेत पुनश्‍च एकदा शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला दिला. रुग्णाचे कुटूंबिय व नातेवाईकांच्या संमतीनंतर सदर रुग्णाच्या जबड्याची यशस्वीपणे शस्त्रक्रीया करण्यात आली. शस्त्रक्रीयेआधी या रुग्णाचे तोंड व जबडा उघडतच नव्हते ते आता 40 एमएम इतके उघडू लागले आहे. त्यामुळे तो रुग्ण आता नियमितपणे जेवण व पाणी पिऊ शकतो. शस्त्रक्रीया यशस्वी झाल्याने आमच्या रुग्णास नवसंजिवनी मिळालाचा आनंद कुटूंबियांनी व्यक्त केला. शस्त्रक्रीया यशस्वीतेसाठी ओएमएफ विभागप्रमुख डॉ.शरन बसप्पा, यांना सर्जरी विभागाचे तज्ञ डॉ. संजय धोतकर,भुलतज्ञ डॉ.मनोज कोल्हे, डॉ.सारिका, डॉ.चैतन्य, डॉ.मयुर यांचे सहकार्य मिळाले. या वैद्यकीय पथकाचे एसीपीएम मेडीकल कॉलेज आणि हॉस्पीटलचे अध्यक्ष आ.कुणाल पाटील,सचिव डॉ.ममताताई पाटील,संस्थचे पदाधिकारी, व अधिष्ठाता यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.गुटखा खाणे टाळावे- डॉ.ममताताई पाटीलगुटखा तसेच तंबाखुजन्य पदांर्थांचे व्यसन करणे शरीराला घातक असून त्यामुळे विविध प्रकारच्या व्याधी जडत असतात. गुटखा खाण्यामुळे तोंडाचे व जबड्याचे आजार होवून अनेकवेळा कॅन्सरही होत असतो. त्यामुळे गुटखा खाणे टाळलेच पाहिजे असे आवाहन जवाहर मेडीकल फाउंडेशनच्या सचिव डॉ.ममतापाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here