वीज कंपनीच्या अधिकार्यांची बैठक
सतिष पवार जिल्हा प्रतिनिधी धुळे – दि २३/०९/२०२४ धुळे तालुक्यात कृषी पंपासह गावात वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो, त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड हाल होत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच ऐन सणासुदीमध्ये ग्रामीण भागातही गावागावात भारनियमना व्यतीरीक्त वीज पुरवठा सतत खंडीत होत आहे. यापुढे शेतकर्यांच्या कृषी पंपांना आणि गावात सुरळीत आणि अखंडीत विज पुरवठा करावा अशा सूचना आ.कुणाल पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना दिल्या. दरम्यान या बैठकीत वीज पुरवठ्याअभावी धुळे तालुक्यातील शेतकर्यांचे हाल होता कामा नये आणि शेतकर्यांचा सहनशीलतेचा अंत पाहू नका अशा कडक शब्दात आ.पाटील यांनी झाडाझडती घेतली.धुळे तालुक्यातील वीज पुरवठ्याच्या समस्यांंसंदर्भात आ.कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि तालुक्यातील शेतकर्यांच्या बैठकिचे आयोजन केले होते. सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी आ.कुणाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता धनंजय भामरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर.एफ.पवार, उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार, उपकार्यकारी अभियंता आर.बी.जोशी, उपकार्यकारी अभियंता श्री निकूंभ यांच्यासह धुळे तालुक्यातील सर्व सबस्टेशनचे अभियंता उपस्थित होते. बैठकीत आ.कुणाल पाटील यांच्यासमोर शेतकर्यांनी कृषी पंप आणि गावात होणार्या वीज पुरवठा संदर्भात समस्या मांडल्या. पावसाने ओढ दिल्याने खरीपाची पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र कृषी पंपाचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पिकांना पाणी देतांना शेतकर्यांचे प्रचंड हाल होत आहेत. जीवाला धोका पत्करुन रात्री अपरात्री शेतात जावूनही वीजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. तसेच ग्रामीण भागातील गणेशोत्सव अंधारत गेला, आता नवरात्र उत्सव, घटस्थापना,विजयादशमी, दिपावली असे महत्वाचे सण येत आहेत. या सणासुदीच्या दिवसातही भारनियमना व्यतीरिक्त वारंवार विज पुरवठा खंडीत होत आहेत. परिणामी नागरीक हैराण झाले आहेत. म्हणून यापुढे शेतकर्यांचा, नागरीकांच्या सहनशीलतेचा अंत न पहाता सुरळीत विज पुरवठा देण्याच्या कडक सूचना आ.कुणाल पाटील यांनी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना बैठकीत दिल्या. शेतकर्यांनी मांडलेल्या तक्रारीनुसार धुळे तालुक्यात अत्यंत कमी दाबाचा विज पुरवठा होत आहे. त्यामुळे तांत्रिक दोष दूर करुन पूर्ण क्षमतेनेही विज पुरवठा करावा असेही आ.पाटील यांनी सांगितले.शेतकर्यांच्या तक्रारी-धुळे तालुक्यातील सबस्टेशनवरील कर्मचारी व अधिकारी शेतकर्यांना उडवाडवीची उत्तरे देत अरेरावी करीत असतात. सबस्टेशनचे अभियंता हेडक्वार्टरला मुक्कामी रहात नाहीत. वायरमन नेमून दिलेल्या गावांमध्ये नियमित येत नाहीत. गावांमध्ये गल्ली बोळात विजेच्या तारा जीर्ण झाल्या असून लोंबकळत असतात. अशा विविध तक्रारी शेतकरी व ग्रामस्थांनी बैठकीत मांडल्या.
वीज पुरवठा सुरळीत होईल-राज्यात कोळशाच्या तुटवड्यामुळे तसेच कोळसा ओला झाल्यामुळे वीजेचा पुरवठा अखंडीत विज पुरवठा करतांना अडचणी उद्भवत

