
एकेकाळचा हिंदुत्ववादी आज सेक्युलरवादी झाला
ही गोष्ट सर्वांनाच खुपायला लागली- धिरज पाटील
हिरवा झेंडा फडकवल्याच्या व्हायरल क्लिपवरुन शिवसेनेचे विरोधकांना प्रतिउत्तर.
सतिष पवार जिल्हा प्रतिनिधी धुळे ९५२७७९९३०४ – धुळे – परवा शिवसेनेचे महेश मिस्त्री यांच्या विषयी एक पोस्ट खूप प्रचंड प्रमाणात व्हायरल करण्यात आली राजकारणाचा भाग म्हणून त्या पोस्टमध्ये अनेक घाणेरडे आरोप करण्यात आले आणि एकेकाळी हिंदुत्ववादी असलेला हा चेहरा फेसबुकच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.आणि त्यामध्ये काल परवाच्या आत्ताच कुठं मिसुरड फुटलेले तरुण हिंदुत्ववादी युवकांचा समावेश होता. या सर्वांसाठी महेश भाऊं मिस्त्री हे रसायन काय आहे हे जरा जाणून घ्या. भाजपाच्या ध्वजात भगवा आणी हिरवा रंग आहेच ना , ते दररोज त्यांचा ध्वज फडकवत असतात मग आम्ही असं म्हणायचे का तुम्ही हिरवे धर्जीने झालात, महेश भाऊ आज धुळे शहर विधानसभेसाठी आमदार पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून भाजपकडून महेशभाऊंना लक्ष केले जात आहे. एकेकाळचा हिंदूत्ववादी आज सेक्युलरवादी झाला ही गोष्ट सर्वांनाच खुपायला लागली आहे. असे प्रतिउत्तर शिवसेना उबाठा चे महानगर प्रमुख धिरज पाटील यांनी आज एका पत्रकाव्दार दिले आहे.
कारसेवेत महेशभाऊ होते अग्रभागी हिंदू रक्षक समितीची केली स्थापना धिरज पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, १९९० साली जेव्हा राम मंदिराच्या निर्माणासाठी कार सेवा संपूर्ण भारतभर घडवुन आणण्यात आली , ती कार सेवा १९९० आणी १९९२ साली पार पडली. १९९० या साली झालेल्या कारसेवेत महेश भाऊ हे अग्रभागी होते.धुळे जिल्ह्यातून जे काही कार सेवक सहभागी झाले होते त्यात शिवसैनिकांचा खूप मोठा सहभाग होता संघ,भाजपा, शिवसेना पदाधिकार्यांसोबत असंख्य शिवसैनिक महेश भाऊंच्या नेतृत्वाखाली या कारसेवेत सहभागी झाले होते. महेश भाऊ मिस्त्री यांच्यासह धुळे जिल्ह्यातील सर्व कार सेवकांना उत्तर प्रदेशातील फतेहगड च्या जेलमध्ये अटक करून त्यांना बंदी देखील बनवण्यात आले होते .जवळपास पंधरा दिवस हे सर्व शिवसैनिक महेश भाऊ सोबत उत्तर प्रदेशात अटक होऊन बंदी होते. महेश भाऊ मिस्त्री हे तरुणपणापासूनच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी भारावून काम करीत असताना एक अल्पसंख्यांक समाजाचा युवक शिवसेनेच्या माध्यमातून १९९१ साली आझाद नगर सारख्या भागातून त्यांच्या मातोश्री पहिल्यांदा निवडून आल्या त्यानंतर सातत्याने महेश भाऊ चार वेळा धुळे महानगरपालिकेत निवडून आले नगरपालिका असताना ११ महिन्यांच्या कालावधीसाठी त्यांनी नगराध्यक्ष पद देखील भूषविले. गळ्यामध्ये सातत्याने सर्व जाती-धर्मांच्या १२ बलुतेदारांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पदक घालून गावभर मिरवणारा महेश भाऊ हा कट्टर हिंदुत्ववादी. पूर्वी शिवसेना भाजपा पक्षाची युती असताना धुळे शहरातील काही मान्यवरांनी येऊन हिंदु रक्षक समितीची स्थापना या शहरात केली , भाजपा शिवसेना युती असताना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू वाहिनी धुळ्यात होणार्या धार्मिक कार्यक्रमात महेश भाऊ अग्रभागी असायचे त्यांच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होताच नसे, हिंदू रक्षक समितीचे महेश भाऊ अध्यक्ष होते.२००८ साली धुळे शहरात झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलीत सहा महिन्यांचा कारावास त्यांना भोगावा लागला . त्यावेळी त्यांनी आपल्या घरावर घरावर हिंदू धर्मासाठी तुळशीपत्र ठेवले होते.
महेशभाऊंच्या आक्रमकपणामुळे आझादनगर भागात हिंदू सुरक्षित
महेश भाऊंच्या आक्रमकपणामुळे आझाद नगर भागात होणारे हिंदू आज पर्यंत सुरक्षित राहिले हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. धुळे शहरातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये महेश भाऊंना मानणारा मोठा वर्ग आहे. २००८ आणि २०११ ची दंगल धुळेकरांनी अनुभवलेली आहे. आजचे हिंदू कट्टर हिंदुत्ववादी, म्हणून मिरविणारे त्यावेळी अर्ध्या चड्ड्या घालून गल्लीबोळात गोटया गोटया खेळण्यात दंग होते. २००८ आणि २०११ च्या हिंदू मुस्लिम दंगलीत वेळी हिंदू बांधवांना वाचविण्यासाठी शिवसेना अग्रभागी होती. त्यावेळी जेव्हा धुळे शहर पेटत होते तेव्हा मी मी म्हणणारे हिंदुत्ववादी अनेक चेहरे आपल्या घरात लपून बसले होते हे देखील त्रिकालाबाधित सत्य आहे. आज महेश भाऊंचे वय ६३ वर्ष आहे. वयोमानानुसार आज देखील हा हिंदुत्ववादी चेहरा धुळे शहरात तितकाच लोकप्रिय आहे गणेशोत्सवामध्ये भगवा झेंडा खांद्यावरती घेऊन नाचविणारा महेश भाऊ अनेकांनी फेसबुक वरती पाहिला तसा तो ईद-ए-मिलाच्या मिरवणुकीमध्ये हिरवा झेंडा फडकवताना देखील पहिला. आणि महेश भाऊ वर टीका सुरू झाले, बरं ही टीका कोणी केली तर या टिकेट भाजपेयी अग्रभागी होते. भाजपाच्या ध्वजात भगवा आणी हिरवा रंग आहेच ना , ते दररोज त्यांचा ध्वज फडकवत असतात मग आम्ही असं म्हणायचे का तुम्ही हिरवे धर्जीने झालात, महेश भाऊ आज धुळे शहर विधानसभेसाठी आमदार पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहेत.
धुळे शहरातील अनेक हिंदू व्यावसायिकांचे व्यवसाय हे मुस्लिम कारागिरांवर अवलंबून आहेत धुळे शहराच्या एमआयडीसीमध्ये अनेक हिंदू बांधवांच्या कारखान्यांमध्ये मुस्लिम कारागीर काम करतात, अनेकांचे कुठे ना कुठे मुस्लिम धर्मीयांशी थोडेफार संबंध येतातच त्यामुळे कोणीतरी उत्साही कार्यकर्त्यांनी महेश भाऊंच्या हातात हिरवा झेंडा देऊन तो झेंडा फडकवायला लावला त्या कार्यकर्त्याचा मान ठेवण्यासाठी त्यांनी तो फडकवला म्हणून महेश भाऊ लाचार झाले मतांसाठी त्यांनी भीक मागितली ही आवाई उठवण्यात आली. आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आ.फारुक शाह कोणामुळे धुळ्यातून निवडून आले!
२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एम आय एम पक्षाचे आमदार फारुक शहा यांना कोणत्या हिंदुत्ववाद्यांनी मदत केली त्यांना आर्थिक रसद कोणी पुरवली. आ.फारुक शहा कोणामुळे निवडुंण आले, गेल्या दोन वर्षात फारुक शहा यांना कोणी सर्वात जास्त निधी दिला आज एम आय एम चे आमदार फारुक शहा यांनी विधान परिषद राज्यसभा निवडणूकीत महायुतीला आपलं मतदान केले ते हिरव मतदान तुम्हाला चालत का? तेव्हा तुम्ही डोळेझाक करायची , तुमचे जिल्हाध्यक्ष जाहीररीत्या बोलतात की एमआयएमच्या आमदाराला भाजपाने वाढवलं तेव्हा तुमचं हिंदुत्व झोपल होत का?बरं हिंदूंचा भगवा मुस्लिमांचा हिरवा, दलितांचा निळा ,धनगरांचा पिवळा, कम्युनिस्टांचा लाल , कोणाचा कोणता तर कोणाचा कोणता हेच आपण करत राहिलो तर जातीय सलोखा निर्माण होणार का? आज हिंदू तरूणांची आपल्या राजकीय फायद्यासाठी कोण डोकी भडकावीतो आहे.धुळे शहरात परत जातीय दंगल व्हावी आणी आपल्याला आमदारकी मिळावी हि कोणाची ईच्छा आहे.या सर्वांचा लेखाजोखा चिठठा चपाटा आमच्या कडे आहेच योग्य वेळ आल्यावर आम्ही तो ओपन करुच.
जातीय दंगली कोणालाच परवडणार्या नसतात..!
मतांच्या राजकारणासाठी सर्वच पक्ष सर्वच धर्मीयांचा जोगावा मांडतात,काल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मुस्लिम बांधवांसाठी वर्षभरातून दोन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि ते ते मुस्लिमधर्जीने झाले असा अर्थ होत नाही.ईद मिलाद असो की रमजान महिन्यातील इफ्तार पार्ट्या यांना राजकीय पक्षातील हिंदू नेत्यांना आमंत्रणामुळे आपली उपस्थिती द्यावीच लागते. त्यात देशाच्या राष्ट्रपतींपासून, पंतप्रधान,मुख्यमंत्री, मंत्री, आमदार ,खासदार ,नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांचा समावेश असतो मग ते लागलीच मुस्लिम धर्जीने होतात का. बरं काल परवा बावनकुळेच्यां मुलाने बिफ खांल्ल्याची बातमी समोर आली त्यावेळी त्याचा निषेध न करणारे हे हिंदुत्ववादी कोणत्या बिळात लपले होते. हिंदुत्ववादाकडून सेक्युलर वादाकडे झुकलेला महेश भाऊ आज सामाजिक जातीय सलोखा राखण्यात धुळे शहरात महत्त्वाची भूमिका बजावितो आहे. ही गोष्ट निश्चितच अभिमानास्पद आहे. जातीय दंगली या कोणालाच परवडणार्या नसतात, अनेक तरुणांचे करियर त्यातून उध्वस्त होते अनेकांचे संसार उघड्यावर पडतात, अनेकांना दंगलीची झळ सोसावी लागते. चार डोके इकडचे चार डोकी तिकडची यांच्यातच जास्त खुमखुमी असते. आग लावायला वेळ लागत नाही पण आग आटोक्यात येई पर्यंत सर्व राख झालेले असते हे तरूणांनी लक्षात घ्यावं.ङ्गराजकारणाचा भाग सोडला तर महेश भाऊ हा हिंदू धर्मात जन्माला आला आहे तो हिंदू राहणार यात शंका नाही. आणि आज त्याच्यावर टीका करून मोकळे झालात पण उद्या ही तुम्हाला मुस्लिम समाजात कार्यक्रमांना देखील जावे लागणार आहे, ही सामाजिक राजकीय परिस्थिती तुमच्यासमोर देखील निर्माण होणार तेव्हा तुम्हाला देखील कोणाचे तरी मन सांभाळायचे आहे तेव्हा काय करणार, असा सवाल देखील धिरज पाटील यांनी या पत्रकात शेवटी केला आहे.














