prabodhini news logo
Home ठळक बातम्या महाराष्ट्राचा हास्यकवि स्पर्धेत ग्रामीण हास्यकवी श्रीराम घडे यांचा प्रथम क्रमांक

महाराष्ट्राचा हास्यकवि स्पर्धेत ग्रामीण हास्यकवी श्रीराम घडे यांचा प्रथम क्रमांक

0
178

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव (साहित्य शाखा) व सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल (कार्यक्षेत्र महाराष्ट्र)यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २१सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २:०० ते ५:०० या वेळेत निमंत्रित कवींचे कविसंमेलन आणि बक्षिस वितरण संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी तर सूत्रसंचालन मनोज वराडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव, श्री.प्रकाश पागे कोषाध्यक्ष, श्री अशोक बेंडखळे कार्यवाह (साहित्य शाखा), शब्दवेल सचिव अश्विनी अतकरे खजिनदार देवेंद्र इंगळकर उपस्थित होते. या याप्रसंगी महाराष्ट्राचा हास्य कवी स्पर्धा २०२४ या स्पर्धेचा बक्षीस वितरण हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये प्रथम श्रीराम घडे:मेहुणीची आरती, द्वितीय क्रमांक अजय माटे :- गूड मॉर्निग पथक, तृतीय क्रमांक :पल्लवी चिंचोळकर उद्यापासून सुरूवात करतेतर उत्तेजनार्थ क्रमांक आर के आठवले, छत्रपती संभाजीनगर -जांगडगुत्ता, रामदास गायधने :- डावा डोया, चेतन सुरेश सकपाळ,विरार :- खड्ड्याचे आभार, महेंद्र सूर्यवंशी,पनवेल :- पडत जा तिच्या पाया,विशाल कुलट,अकोट :-जुटीन काय भौ यंदा माय लगन,रुतुजा कुलकर्णी :-खिशातलं पाकीट चेक करायला हवं ,नंदेश गावंड, अलिबाग – निराशा, अशोक मिरगे :- माझी कोपरखळी, रविकिरण पराडकर, चेंबूर, पॉझिटिव्ह, सागर सोनवणे,बेलापूर :- भाऊबीज यांना प्राप्त झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रतिभा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली सहसचिव रामदास गायधने, संघटन प्रमुख नवनाथ माने,केंद्रिय प्रसिध्दी प्रमुख विलास पुंडले यांनी केले आभार प्रदर्शन प्रतिभा विश्वास यांनी केले. हास्यकवी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून हास्य कवी श्रीराम घडे यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here