नागरिकांच्या सुविधेसाठी मी स्वखर्चाने काम करून देतोय – ठेकेदार सुशील पवार यांचे स्पष्टीकरण
इंदापूर (जाचकवस्ती) महेश कदम : दि. 26, इंदापूर तालुक्यातील मौजे जाचकवस्ती येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग लगत असलेल्या प्रवीण थोरात ते गणेश पाटोळे यांच्या घरापर्यंत असलेल्या 20 फुटी अंतर्गत रोड वर होत असलेल्या बंदिस्त गटार कामामुळे (ड्रेनेज)आणि येथील रस्त्याची दुरावस्था झाल्याची चर्चा ग्रामस्थामधून होत आहे…
सदरचे काम सुरु करत असताना येथील नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी घेतलेली दिसत नाही त्यामुळे येथील 2-3 लहान मुलं आणि वयोवृद्ध महिला यांना इजा झाली आहे… येथील कामासाठी ज्या पाईप आणल्या आहेत त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याची चर्चा ग्रामस्थामधून होत आहे..
पावसाळा सुरु असल्याने याठिकाणी एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचे काम होत असलेल्या ठिकाणी दररोज वाहने अडकण्याचं सत्र सुरु असून त्यामुळे वाहनाचे देखील मोठया प्रमाणात नुकसान होत आहे…
संबंधित गटार कामाची कोणतीही परवानगी नसताना आणि सदरच्या कामाचे कोणतेही एस्टीमेट नसताना ठेकेदार सुशील पवार यांनी हे काम सुरूच केले कसे? असा प्रश्न येथील ग्रामस्थाना पडला होता…त्यावर विचारणा केली असता ठेकेदार सुशील पवार यांनी सदरचे गटार काम मी स्वखर्चाने (कोणत्याही शासकीय निधीचा वापर न करता ) करून देत आहे, या कामामध्ये ग्रा.पं. जाचकवस्ती(सरपंच, ग्रामविकास अधिकारी), गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.पुणे यांचा काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.
सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असलेले पाहून येथील रहिवाशी यांनी सदरचे काम थांबवले होते परंतु ठेकेदार सुशील पवार यांनी हे काम माझे खाजगी काम आहे, यामध्ये एकही रुपया शासनाचा नाही त्यामुळे तुम्ही हे काम थांबवू शकत नाही नाही असे म्हणत येथील नागरिकांना धमकावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
ठेकेदार सुशील पवार यांच्या चुकीच्या कामामुळे येथील रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने नागरिकांची येण्या-जाण्याची मोठी गैरसोय झाली आहे… ठेकेदाराने या कामासाठी संपूर्ण रस्ता उचकाटून टाकला असून संपूर्ण रस्त्यावर मुरूम न टाकता काळी माती टाकून वाहधारकांची मोठी गैरसोय केली आहे…त्यामुळे अडकलेली वाहने अक्षरशः ट्रॅक्टरने काढावी लागत आहेत, मोटारसायकल उचलून घरी घेऊन जाव्या लागत आहेत, लहान मुले दररोज घसरून पडत आहेत, पेशंट ला खांद्यावर नेण्याची वेळ येथील नागरिकांवर आली असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
ठेकेदार सुशील पवार स्वखर्चाने बंदिस्त गटार चे काम का करून देत आहेत?? त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून?? सुशील पवार यांच्या मागे कुणाचा हात आहे का?? तुम्ही कोणतेही काम सांगा मी स्वतःच्या पैशातून करून देतो असे आमिष ठेकेदार सुशील पवार येथील नागरिकांना का देत आहेत? यामागे काही डाव आहे का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे…संबंधित ठेकेदार सुशील पवार हे पाठीमागच्या काळात जाचकवस्ती या गावाचे सरपंच ही होते आणि त्याच कमाई मधून तर हे पैसे खर्च करत नसतील ना असा संशय येथील नागरिकांमधून व्यक्त होतोय… त्याच बरोबर संबंधित ठेकेदार सुशील पवार यांनी सरपंच झाल्यापासून बराच पैसा कमावून काही त्यांच्यावर असणारी कर्ज भरून, बारामती येथे काही मालमत्ता, चारचाकी गाड्या विकत घेतल्याची आणि याच पैशावर संपूर्ण देशभर फिरून मौजमजा केल्याचीही कुजबुज नागरिकांमधून ऐकला मिळत आहे… त्याचबरोबर ठेकेदार सुशील पवार यांनी सरपंच असताना आणि नसताना अशाच प्रकारची कोण कोणती आणि किती व कुठे कुठे कामे केलीत याची देखील चौकशी करायला पाहिजे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
या त्रासाबद्दल बद्दल वारंवार सांगून देखील ग्रा.पं. प्रशासन जाचकवस्ती दखल घेत नसल्याने येथील नागरिकांचे प्रचंड मानसिक,आर्थिक नुकसान होत आहे.
सदरच्या कामाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता या कामाबद्दल कोणतीच अधिकृत माहिती आमच्याकडे नसल्याचे सरपंच प्रतिनिधी महेश निंबाळकर (महिला सरपंच यांचे पती )आणि ग्रामविकास अधिकारी संदीप सोडमिसे ग्रा.पं. जाचकवस्ती यांच्याकडून सांगण्यात येत आहे…ही बाब अत्यंत गंभीर असून याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
आता तरी प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

