
कोपरगाव तालुका प्रतिनिधी: इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख 9860910063 – एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच कोपरगाव तालुक्यातील साखळी उपोषणाला परिश्रम घेणारे कोपरगाव एकलव्य संघटना तालुका कमिटी यांच्या उपोषणाला आज यश आले.
कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे तहसीलदार गटविकास अधिकारी नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी उपोषण स्थळी येऊन भेट दिली.
यावेळी एकलव्य संघटना ता.अध्यक्ष उत्तम पवार व एकलव्य संघटना ता.कार्याध्यक्ष निलेश ठाकरे यांनी दोन तास आमदार व सर्व अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली या मध्ये ज्या गावात जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी गावठाण मध्ये आदिवासी समाजाला घरकुल देण्यात येणार आहे. गायरान जमीन गावठाण जमीन इतर अतिक्रमण असलेल्या राहत्या घराच्या जागा नावे करण्यात येणार आहे दफन भूमी आदिवासीच्या नावे करून दुरुस्ती करण्यात येणार आहे, तसेच आदिवासींचा बजेट कायदा असला पाहिजे या साठी आमदार विधानसभेत ते आदिवासी समाजाच्या वतीने मांडणार आहे तसेच आदिवासी समाजाचा बजेट कायदा कसा असला पाहिजे याचा ड्राफ्ट एकलव्य संघटने कडे आहे तो ड्राफ्ट विधान सभेत मांडण्यात येणार आहे कोपरगाव तालुक्यातील आदिवासींचे सर्वच प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी स्वरूपात घेण्यात आले तसेच रेशनकार्ड गावपातळीवर घेण्यात येणार आहे त्याच्यासाठी 1 तारखेला 10 कार्यकर्त्यांना कॅम्प कसा घ्यायचा याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच कोपरगाव शहरी भागातील सर्वच प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी पत्र देण्यात आले थोडक्यात कोपरगाव तालुक्याच्या सर्वच मागण्या प्रगती पथावर आहे दरम्यान चर्चा पूर्ण झाल्यानंतरही एकलव्य संघटनेचे प्रदेश महासचिव किरण ठाकरे सर उपोषण ठिकाणी पोहचेपर्यंत आमदार आशुतोष काळे व सर्व अधिकारी थाम्बुन होते ठाकरे सरांची पुन्हा महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करून वा त्यांची सहमती घेतल्यानंतरचे आजचे उपोषण कर्ते घारी वा इंदिरानगर च्या समाजबंधवांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.














