
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी पुणे– कात्रज धनकवडी क्षेत्रीय कार्यालय मोहल्ला कमिटी सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर पार पडली. सहाय्यक आयुक्त सुरेखा भाणगे यांनी मीटिंग आयोजित केली होती. त्यावेळेस प्रशांत कांबळे आप चे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग उपस्थित होतो. त्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करून भागातील कामे या मीटिंगमध्ये मांडण्यात आली. महिलांसाठी या विभागामध्ये स्वच्छतागृह बांधावे दत्तनगर चौक विंडसर काउंटी समोर शनी नगर चौक या ठिकाणी स्वच्छता ग्रह केल्यास आंबेगाव खुर्द आंबेगाव बुद्रुक कात्रज नरेगाव सच्चा माता परिसर अशा येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना मुलींना वापरता येणार आहे. सच्चाई माता परिसर अटल 10 11 12 मध्ये ड्रेनेज पाईपलाई टाकने ड्रेनेच पाणी अनेक चाळीमध्ये आल्याने दुर्गंधी किडे अशा विविध समस्येला नागरी तोंड देत आहे. अनेकांनी घर सोडून दुसरीकडे भाड्याने राहात आहे. स्पीड ब्रेकर बांधणे ड्रेनेज चे पाणी सातत्याने रस्त्यावरती वाहत असते. त्याचे निवारण करणे अनेक भागांमध्ये पोल आहेत त्यावरती लाईट बंद पडून आहेत. त्या त्वरित चालू करणे ज्या भागामध्ये पोल नाहीत ते त्वरित लावणे. अंधाराचा फायदा घेऊन महिलांना मुलींना छेडण्याचे प्रकार नागरिकांना लुटण्याचे प्रकार काही समाजकंटकाकडून सुरू असते.
दत्तनगर येथे ट्राफिक ची समस्या उपयोजना करणे राजमाता भुयारी मार्ग जवळ रस्त्याचे काम पूर्ण करणे दत्तनगर ते कात्रज अनधिकृत बांधकाम कारवाई करणे दत्तनगर भागात आरोग्य कोटी बांधणे दत्तनगर मध्ये भाजी मंडई लाखो रुपये खर्च करून अनेक वर्षापासून पडून आहे. त्वरित ती सुरू करावी हनुमान नगर मध्ये कमी दाबाने पाणी येत आहे. या सर्व भागांमध्ये कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये हा परिसर समाविष्ट असताना सुद्धा मोठा या विभागामधून पालिका टॅक्स गोळा करते. परंतु नागरिकांना सुविधा देण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. सदर कामे तातडीने करून घ्यावे असा आदेश सहाय्यक आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.











