आजची कविता- आयुष्यावर बोलू काही
आयुष्य म्हणजे
दोन घडीचा डाव
जेवढा खेळु
तेवढा गुंता.
मनासारखं जगता
येत नाही
दुसऱ्याच ऐकुन
घ्यावेच लागते.
आपल्यालाही मन असतं
स्वतःचे विचार मांडता येत नाही
सगळ्यांच्या वेळा पाळताना
आपली होते खुपचं फरपट
सगळ्यांना असते घाई
डबा करायचा पटपट.
आयुष्याच्या पटावरती
अस्तित्व आपले मरुन जाते
कोणाचे कोणा वाचुन
कधीच ना अडते.
आयुष्य जगताना
येतात खाच खळगे
त्यांनाही पार करुन
पळायचे पुढे मागे.
दमछाक होते पळताना
तोल सावरुन धरावा
उभे राहावे खंबीरपणे
मनाचा तोल ढळु न द्यावा.
कवयित्रीसौ. सुनंदा वाळुंज
ठाणे

