बल्लारपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी बल्लारपूर तालुका व शहर तर्फे मा. उपविभागीय अभियंता सां.बा विभाग बल्लारपूर यांच्यामार्फत मा. मुख्य अभियंता रस्ता बांधकाम विभाग गडचिरोली जिल्हा गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी या गावांमध्ये असलेली वर्धा नदी वरती नवीन पुलिया चे बांधकाम मागील दोन वर्षापासून बंद आहे परंतु जुना पुलिया हा नियमित चालू असून त्या रस्त्याची अवस्था ही खूप वाईट व बिकट परिस्थिती व दुर्घटना घडण्याचा स्थळ झाला आहे. त्या रस्त्यावर रोज हजारो प्रवासी ज्याने येणे करतात. तसेच सुरजागड प्रकल्पाचे रोज हजारो ट्रक दिवस-रात्र आवक जावक चालू राहतात. परंतु रस्त्याची दूरव्यवस्था इतकी वाईट परिस्थिती आहे की खोल खोल गड्डे पडले आहे व आजूबाजूला अर्धा फूट गड्डे व पाणी साचलेले असतात.
त्यामुळे अनेकांना गाडी चालवताना जीव धोक्यात टाकून त्या रस्त्यांनी येणे जाणे करावे लागत आहे. कोठारी हा गाव शिक्षण व मिरची व्यवसाय करिता प्रसिद्ध असून हजारो लोक येतात तरी शासनाने या रस्त्याकडे पाठ फिरवली असून मागील दोन वर्षापासून या रस्त्याचे बांधकाम परिपूर्ण केले नाही व हजारो लोकांच्या जीवांशी खेळ चालू आहे व रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे तरी याकरिता वंचित बहुजन युवा आघाडी नी मागणी केली आहे की जुना रस्त्याचे बांधकाम हेच त्वरित दुरुस्ती करण्यात यावे व लोकांच्या जीवाशी खेळ बंद करावे. अन्यथा कोणत्याही निरपराध व्यक्तीच्या जीव गेल्यास महाराष्ट्र शासन व रस्ता बांधकाम विभाग हे जिम्मेदार राहणार जर असे काही घडल्यास वंचित बहुजन युवा आघाडी येणाऱ्या काळामध्ये आंदोलन ची भूमिका घेणार तरी लवकरात लवकर जुना रस्ता दुरुस्ती करण्यात यावा असे निवेदनाच्या स्वरूपातून मागणी करण्यात आली.
निवेदन देत असताना मा. अश्विन शेंडे जिल्हा सदस्य चंद्रपूर, सुदेश शिंगाडे जिल्हा सदस्य, अभिलाष चुनारकर तालुकाध्यक्ष, शुभम नागापुरे शहराध्यक्ष,सत्यभामा भाले, जिल्हा सल्लागार , नम्रता साव तालुका अध्यक्ष, सुप्रिया चंदनखेडे जिल्हा सचिव,उमेशरस्ता कडू शहराध्यक्ष, रेखा पागडे शहराध्यक्ष, प्रज्ञा नमनकर, नंदा देशभ्रतार, रीना कांबळे, वंदना पुणेकर, प्रशांत सातकर, वतसला तेलंग, शालिनी जयकर, शीला बोरकर, सोनाली दुबे, आचल लाकडे, शुभम सोनटक्के, सागर गेडाम,आशिष भसारकर, गजेंद्र मळावी, प्रणय उईके, अशोक लोणारे,सम्यक रामटेके, राहुल वाडके, धीरज मुरमाडे, स्वराज करमरकर, स्वप्निल जीवने, प्रियंकेश शिंगाडे, अमित ब्राह्मणे, सागर घेर, रोशन कुक्कुटकर, शुभम शेंडे व अन्य युवा पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

