कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगरने पटकावला प्रथम क्रमांक
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर:-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे कामगार व कामगार कुटुंबीयांच्या विकासासाठी योगदान देत आहे याबद्दल कौतुक करून कोणत्याही स्पर्धेत यश मिळाले की हुरळून जाऊ नये. अपयश आले तर खचून जाऊ नये तसेच कलाकारांनी आपली कला निर्मितीचा आनंद हा स्वानंदासाठी व समाजाच्या हितासाठी करावा असे मत मा.श्रीराम पान्हेरकर यांनी व्यक्त केले ते पुरुष भजन स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमात व्यासपीठावरून अध्यक्ष म्हणून बोलत होते.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या चंद्रपूर गटाअंतर्गत ललित कला भवन बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे आयोजित गटस्तरीय कामगार पुरुष भजन स्पर्धा दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमित्त मा. रविराज ईळवे साहेब कल्याण आयुक्त मुंबई व मा. नंदलाल राठोड साहेब उपकल्याण आयुक्त मुंबई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या भजन स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक व मा.रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारी,चंद्रपुुर यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्रीराम लक्ष्मण पान्हेरकर गुणवंत कामगार व समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन प्राप्त तथा सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती चंद्रपूर, प्रमुख पाहुणे मा. किसन नागरकर महापारेषण कर्मचारी तसेच उपाध्यक्ष नाते आपुलकीचे संस्था,अध्यक्ष नाते रक्ताचे संस्था,मा.रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारी, चंद्रपूर तसेच परीक्षक यांची उपस्थिती होती.
या भजन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पुरुष भजनी संघ प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर, द्वितीय कामगार कल्याण केंद्र बल्लारपूर, तृतीय नगीना बाग वसाहत चंद्रपूर तसेच उत्कृष्ट पुरुष तबलावादक मध्ये प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र मुलरोड चंद्रपूरचे विनोद मधुकर भोयर ,द्वितीय साईबाबा वसाहत बल्लारपूरचे सोमेश्वर डोंगरवार ,तृतीय ललित कला भवन चंद्रपूरचे सुखदेव सिताराम प्रधान व उत्कृष्ट पुरुष गायकमध्ये प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र बल्लारपूरचे विनोद गजानन कुडे, द्वितीय कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगरचे सदाशिव बळीराम आघाव ,तृतीय कामगार कल्याण केंद्र पुलगाव, उत्कृष्ट हार्मोनियमवादक प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र बल्लारपूरचे दीपक आनंदराव मेश्राम ,द्वितीय नगीनाबाग वसाहतचे कैलास भैय्याजी पेटकर ,तृतीय कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगरचे राजेंद्र पोईनकर आणि उत्कृष्ट भजन तालसंचालनमध्ये प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र बल्लारपूर, द्वितीय कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर ,तृतीय नगिनाबाग वसाहत चंद्रपूर यांनी अनुक्रमे पारितोषिक पटकाविले .मान्यवरांच्या हस्ते भजनस्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.कामगार पुरुष भजन स्पर्धेचे परीक्षण मा. जी.ए. कुरेशी मॅडम मा. नंदराज जीवनकर, मा. श्रीकांत कासलीकर यांनी परीक्षण केले.या गतस्तरीय भजन स्पर्धेतून प्रथम आलेल्या संघाची निवड राज्यस्तरीय भजन स्पर्धेकरिता झालेली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारी चंद्रपूर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार किरण उपरे शिशुमंदिर शिक्षिका ललित कलाभवन बंगाली कॅम्प चंद्रपूर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता चंद्रपूर गटातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला उपस्थित तिन्ही जिल्ह्यांमधून दहा संघ सहभागी झाले होते.

