ईगतपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहिर होणार आहेत.या पाश्र्वभूमीवर राजकिय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.म.वि.आ.त कॉंग्रेस व उ.बा.ठा.ने ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकतानां हा आपलाच गड असल्याचे दावे केले आहेत. या पाश्र्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडुनही माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी हा मतदारसंघ आपलाच बालेकिल्ला असल्याचा दावा केला आहे.
सन १९९९ साली शिवसेनेचे पांडुरंग गांगड हे या मतदारसंघातुन विजयी झाले होते. तर सन २००४ मध्ये शिवसेनेकडुन उमेदवार बदलल्यानंतरही जनतेने शिवसेनेलाच कौल देत काशिनाथ मेंगाळ यांना विजयी केले होते.
हा मतदारसंघ अनुसुचित जमाती साठी राखीव असुन यातही ठाकुर समाजाचे येथे प्राबल्य आहे.
ठाकुर समाजाला जेव्हा जेव्हा उमेदवारीच्या रुपाने शिवसेनेकडुन प्रतिनिधीत्व मिळाले आहे, तेव्हा तेव्हा हया मतदारसंघातुन शिवसेना विजयी झाली आहे. आणि जेव्हा जेव्हा या समाजाला डावलले गेले तेव्हा तेव्हा मतदारानीं शिवसेनेला नाकारले आहे हा इतिहास आहे.
सन १९९९ मध्ये ठाकुर समाजाचे पांडुरंग गांगड यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळी पहिल्यादांच शिवसेनेचा भगवा झेंडा या मतदारसंघावर फडकला होता.
सन २००४ मध्ये गांगड यांना उमेदवारी न देता ठाकुर समाजाचेच युवा नेते काशिनाथ मेंगाळ यांना उमेदवारी दिली गेली.सलग दुसर्यांदा उमेदवार बदलुनही ठाकुर समाजाच्या पाठिंब्यावर मेंगाळ यांचे रुपाने शिवसेनेने या मतदारसंघातुन विजय मिळवला होता.
सन २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेत फुट पडुन मनसेची स्थापना झाली होती.त्यावेळी तत्कालीन आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी मनसेकडुन निवडणुक लढवली होती.त्यांचा या वेळी निसटता पराभव झाला होता,तर शिवसेनेने ठाकुर समाजाला डावलल्याने दारुण पराभव होत हा पक्ष तिसर्या क्रंमाकावर फेकला गेला होता.
सन २०१४ च्या निवडणुकीत अगदी अंतिम क्षणाला ठाकुर समाजाचे काशिनाथ मेंगाळ यांना डावलुन इतरानां उमेदवारी दिल्याने पुन्हा एकदा शिवसेनेला पराभवाचे तोंड पहावे लागले होते.विशेष म्हंणजे ठाकुर समाजाचे काशिनाथ मेंगाळ यांनी अपक्ष उमेदवारी करत तब्बल वीस हजाराचे आत मते मिळवली होती.जी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारापेक्षा केवळ चार पाच हजारानीं कमी होती.
सन २०१९ मध्ये या समाजाचा उमेदवारच रिंगणात नव्हता.
दरम्यान ठाकुर समाज हा नेहमीच शिवसेनेसोबत राहिला आहे.ठाकुर समाजाला जेव्हा शिवसेनेमध्ये स्थान मिळाले तेव्हा तेव्हा या समाजाचे बळावर पक्षाला आमदार, पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही सत्ता मिळाली हा इतिहास आहे. आणि जेव्हा या समाजाला डावलले गेले तेव्हा शिवसेना सत्तेपासुन वंचित राहिली हा वास्तव इतिहास आहे.

