prabodhini news logo
Home आरोग्य इंडस्ट्रीलिज श्रीकांत बडवे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान

इंडस्ट्रीलिज श्रीकांत बडवे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान

0
96

शिबिराचे यंदा २३वें वर्ष.

पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : बेलराईज इंडस्ट्रीज उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकांत बडवे यांच्या वाढदिवसा निमित्त बेलराईज उद्योग समुहात बेलराईजच्या विविध फॅक्टरयांमध्ये दिनांक १० ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ही ‘रक्तदान शिबिराची’ परंपरा मागील २३ वर्षापासून सुरू आहे. अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून कंपनीतील कर्मचारी व रक्तदात्यांसोबत श्रीकांत बडवे यांनी संवाद साधला. अनेकांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, फोन कॉल व मेसेजच्या माध्यमातून बडवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. या कार्यक्रमास सुजय प्रतिष्ठानचे सुरेश सकपाळ व अनेक रक्त पेढ्यांचे सहकार्य लाभले. तसेच या सगळ्या कार्यक्रमात विविध रोटरी क्लबचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here