दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 ऑक्टोबर 1956 ला चंद्रपुरात लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दरम्यान दरवर्षी 15 व 16 ऑक्टोबर ला चंद्रपुरात दीक्षाभूमीवर लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळं 16 ऑक्टोबर ला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते राजू झोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
संपूर्ण जगातुन 8 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन लाखो अनुयायी नागपूर व त्यांनतर चंद्रपुरात होणाऱ्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दाखल होतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातून सुद्धा लाखोंच्या संख्येने नागरिक दीक्षाभूमीवर दाखल होतात. मात्र शासकीय सुट्टी नसल्याने दारू दुकाने, अवैध व्यवसाय सुरू असून त्यामुळं कायदा व सुव्यवस्था तसेच अनुचित प्रकार घडत असतात. त्यामुळं 16 ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी यांनी स्वतः शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.

