ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात होणार तिरंगी सामना

0
392

विजय वडेट्टीवारांना पक्षांतर्गत संघर्षाचा फटका बसणार

नवनिर्वाचित उमेदवार चक्रधर मेश्राम यांच्या एंट्रीने भाजप काँग्रेसला झटका..?

ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क -दि.२१/१०/२०२४ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. त्यापैकीच ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचा चंद्रपूर जिल्ह्यात समावेश होतो. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असल्याने या मतदारसंघाला राजकीय दृष्टिकोनातून वेगळेच महत्त्व आहे. युती असो की आघाडी, या दोघांनीही ब्रह्मपुरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? या मतदारसंघातील सध्याचे चित्र काय आहे?
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला ? मात्र, भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००८ साली झालेल्या परिसीमनानुसार, ब्रह्मपुरी मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील सावली व सिंदेवाही हे तालुके, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, ब्रह्मपुरी ही महसूल मंडळे आणि ब्रह्मपुरी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाच्या अतुल देशकर यांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. आता २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत धोकेबाजांपासुन सावध राहण्याचे जनतेला आवाहन करित ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.त्यामुळे तिरंगी लढत होणार आहे.
२०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी एकहाती विजय मिळवला होता. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना एकूण ७० हजार ३७३ मते होती; तर भाजपाच्या अतुल देशकर यांना ५६ हजार ७६३ मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार यांना ९६ हजार ७२६ मते मिळाली होती.
या मतदार संघातील
महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले नसले तरी हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार ? विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे उमदेवार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, यावेळी विजय वडेट्टीवार यांना पक्षातील अंतर्गत आव्हानांचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील पक्षांतर्गत वर्चस्वाचा वाद अनेकदा बघायला मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांच्या समर्थकांनी ब्रह्मपुरी येथे कुणबी अधिवेशन घेतले होते. त्यात काँग्रेसच्या नेत्यांनी वडेट्टीवार यांना लक्ष्य केले होते. चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या मेळाव्यात मतदार संघामध्ये बहुसंख्य कुणबी असतांना अल्पसंख्याक व्यक्ती (वडेट्टीवार) या मतदारसंघाचे नेतृत्व कसे काय करू शकते, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचप्रमाणे हे चित्र बदलण्याचेही आवाहन केले होते. त्यामुळे वडेट्टीवारांना काँग्रेसच्या नेत्यांकडूनच घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.चक्रधर मेश्राम यांनी सर्वधर्मसमभाव तत्वप्रणालीने निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आणि विविध विकास कामांचा पाढा वाचल्याने सज्जन मतदार काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष वेधले आहे.
त्याशिवाय भाजपाकडून अतुल देशकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलाताना अतुल देशकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहावे, असा हा संदेश भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. हे म्हणत एक प्रकारे त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. असे असले तरी ब्रह्मपुरी मतदारसंघातील जातीय समीकरण बघता, भाजपाकडून कुणबी उमेदवार दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. एकंदरीतच ब्रह्मपुरीत तिरंगी सामना रंगणार आहे. जवळपास जनचर्चेवरुन निश्चित मानले जात आहे . धोकेबाज आणि घराणेशाही चालविणाऱ्या पासून सावध राहाण्याचे जनतेला आवाहन करिता ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे नियोजन पद्धतीने, सातत्यपूर्ण प्रयत्न करीत असल्याने, विविध सामाजिक संस्था आणि धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. रस्ते ,विज , पाणी पुरवठा , स्वच्छता आरोग्य , शिक्षण, व्यवसाय उद्योग आणि व्यापार , रोजगार यांसारख्या अनेक विषयांवर भर दिला आहे त्यामुळे चक्रधर मेश्राम यांच्याकडे मतदारसंघात युवापिढींचा , महिला आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here