prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – शाळेचा पहिला दिवस

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – शाळेचा पहिला दिवस

0
140

उन्हाळ्याची सुट्टी संपली
शाळा सुरू झाली
छोट्या मित्रांना बघून
पुन्हा शाळा बहरली

किलबिलाट बघून
शाळा गोड हसली
मुलांविना ती होती
रुसून शांत बसली

स्वागत झाले बाळांचे
गुलाब पुष्प देऊन
वंदन केले शिक्षकाला
दोन्ही कर जोडून

प्रभात फेरी निघाली
साऱ्या गावागावातून
मुले चालली शिस्तीत
देशभक्ती गीत गाऊन

नवी पुस्तके, नवे दप्तर
गणवेशही नवा दिला
जेवणाच्या सुट्टीमध्ये
गोड खाऊ मिळाला

शिक्षक वर्गात येताच
मुले सावधान झाले
मातृभाषा शिकताना
कवितेत रमून गेले

शाळेच्या पहिला दिवसाचा
आनंद असतो वेगळा
दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर
भरतो बालगोपाळांचा मेळा

संगीता नागदिवे (सना)
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here