जन्म देऊन
दाखवले जग
चालण्या जगात
शिकवले हात धरून.
मायेची पाखड
प्रेमाची डोळ्यांनी भिरभिर.
शिक्षण, संस्कार शिंपड
त्यांनी झालो संस्कारित.
स्वच्छता – वागणूक – शिस्तीचे
समजावून सांगत धडे
रूजवले खेळ कलागुण, कर्तृत्वाचे
आमच्या स्वभावात आराखडे.
पप्पा, तुमच्याचमुळे हा
जीवन जगण्याचा पाया भक्कम.
समाजात संभाषण, समतोल राखत
जगतो आंम्ही हळूवार तुमचा धाक मनी जपत.
(वडील – श्री. मधुकर ल. झिराडकर.)
(आंम्ही – चार मुली.)
(जन्म – 04.05.1936.
देवाज्ञा – 13.06.2025.
डाॅ. सौ. स्मिता एस. मुकणे.
ठाणे

