शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कोपरगाव तालुका उपाध्यक्ष कृष्णा आहेर यांचा राजीनामा

0
195

कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख ७६२०२०८१८०- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कोपरगाव तालुका उपाध्यक्ष माननीय कृष्णा आहेर यांनी असे म्हटले की कोपरगाव तालुक्यात शिवसेनेचे मोठे संघटना असून शिवसेनेला विधानसभेची जागा न मिळाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडीचे संदीप वर्पे यांना आमदार म्हणून निवडून आणणार व त्यानंतर शिवसेनेमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे व शिवसेनेला जागा न मिळाल्यामुळे व कोपरगाव तालुका प्रमुख दहा महिन्यापासून का नेमला नाही यावरती सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे असे स्पष्टीकरण यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here