मजुरीचे दर भिडले गगनाला, मजुराचीं गुजीगुजी करुनही वानवा

0
73

ईगतपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – परतीच्या पावसाने बळीराजाची अपरिमीत हानी केल्यानंतर राहिले साहिले पीक काढण्यासाठी बळीराजाची तडफड सुरु झाली आहे.दरम्यान भात, नागली व वरई आदी खरिप पिकाचीं सोंगणी परतीच्या पावसामुळे एकाच वेळी आल्याने कामासाठी मजुरानां मोठा भाव आला आहे.
तीनशेच्या आसपास असणारा मजुराचा दर थेट पाचशेवर जाऊन पोहचला असुन शिवाय मजुरास घरी जा ये करणेचे भाडे व चहापाण्यासह एकवेळचे जेवण ही दयावे लागत आहे. यामुळे मजुराची सरासरी मजुरी प्रतिदिवस आठशे रुपयाच्या घरात जात आहे.
परतीच्या पावसाने यंदा जाता जाता खरिप पिकाला मोठा दणका दिला आहे. यासह मावा व करपा रोगालाही पिक बळी पडुन नुकसान झाले आहे.त्यामुळे पदरात पडेल ते पिक घरी आणण्याची घाई सुरु झाली आहे. त्यातच पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने सोंगणीची यंत्रेही कुचकामी ठरत आहे. यामुळे मनुष्यबळाशिवाय सोंगणी अशक्य बनली आहे.
वाढत्या मजुरीच्या मागणीमुळे मजुरीचे दरही कडाडले आहेत. एवढा रोज देऊनही मजुराचीं गुजीगुजी करावी लागत आहे.आणि तरीही मजुर भेटत नाही.यामुळे यंदा शेतकरी राजाची दिवाळी सोंगणीच्या कामातच जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here