घन:शाम आण्णा शेलार यांचा महाविकास आघाडीचे काम करण्याचा निर्णय

0
698

सुभाष दरेकर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर 9858322466- अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रमुख दावेदार असलेले काॅग्रेस पक्षाचे नेते घन:शाम आण्णा शेलार यांनी आज काही प्रमुख कार्यकर्ते ची श्रीगोंदा येथे पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक बोलावली होती या बैठकीत जवळ जवळ दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी आप आपली मते मांडली गेल्या विधानसभा निवडणुकीत शेलार यांना ९९हजार मते मिळाली होती. विजयाच्या उंबरठ्यावर असलेले शेलार यांना यंदा उमेदवारी निश्चित मानली जात होती काॅग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी श्रीगोंद्याची जागा वाटपात काॅग्रेस कडे राहावा म्हणून प्रयत्न केला परंतु ही जागा उबाठा गटाला गेली व घनश्याम आण्णा शेलार यांची संधी हुकली व बंडखोरी करण्याचा प्रयत्न काॅग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांनी हानुन पाडला पण आज घनश्याम शेलार यांना श्रीगोंद्यातील कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हा प्रश्न भेडसावत आहे कारण ही तसेच आहे सर्वच उमेदवारांनी शेलार यांना नेहमीच राजकारणात मागे ओढण्याची जणू स्पर्धाच लावली होती अशा परिस्थितीत कुणाला पाठिंबा द्यायचा हा पेच निर्माण झाला आहे नेहमी च आपली भूमिका ही कार्यकर्त्यांवर सोपवुन देऊन कार्यकर्ते म्हणतील तो निर्णय घेणारा हा नेता मग शेलार यांनी उद्या च्या पाठिंब्याचा निर्णयाचा चेंडू कार्यकर्त्यांच्या कोर्टात टाकला व आज अनेक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी बरोबर राहावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या भविष्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल व आपण श्रीगोंदा तालुक्यातील काॅग्रेस पक्षाचे नेते आहात त्यामुळे घनश्याम आण्णा शेलार यांनी महाविकास आघाडी बरोबर राहावे असा आग्रह जवळ जवळ ९०टक्के कार्यकर्त्यांनी धरला व तो ठराव मंजूर करण्यात आला परंतु श्रीगोंद्यात महाविकास आघाडीचे काम करायचे कि नाही याबाबत कोअर कमिटी स्थापन करून दोन दिवसांच्या आत निर्णय करण्याचे ठरले यावेळी संजय आनंदकर श्रीपाद ख्रिस्ती सुहास झेंडे केशव झेंडे शाहुराजे शिपलकर प्रकाश निंभोरे निभोरे सर सतिष जामदार औटी मेजर रघुनाथ सपताळ व अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here