40 टेबल, 165 कर्मचारी, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट सह मशीन होतेय तयार

0
48

मंगेश जनबंधू तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज, भंडारा 9764139585 भंडारा. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 61-भंडारा विधानसभा मतदारसंघासाठी आज पोलीस बहुउद्देशीय सभागृहात निवडणूक विभागाने मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया शुरू केली आहे.

भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी ईव्हीएम व्हीव्हीपैट तयार करण्यासाठी 4० टेबल लावले आहेत. 61 भंडारा विधानसभा मतदारसंघात 435 मतदान केंद्र आहे.

या मतदारसंघासाठी 1044 बैलेट यूनिट, 522 कंट्रोल युनिट आणि 565 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत.

165 कर्मचारी मशीन तयार करण्यासाठी नियुक्त

165 कर्मचारी आज मशीन तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी, 61- भंडारा गजेंद्र बालपांडे, निवडणूक अधिकारी पवनी तहसीलदार सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पोलीस बहुउद्देशीय सभागृहामध्ये ही प्रक्रिया करण्यात आली.

यावेळी सामान्य निरीक्षक दिलीप कुमार गुप्ता आणि जिल्हाधिकारी कोलते यांनी देखील भेट देऊन पाहणी केली.

विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर ला मतदान

विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने भंडारा विधानसभा मतदारसंघात मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात आज करण्यात आली.

या मशिन तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी कार्यालयात 40 टेबल लावण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी याप्रमाणे एकूण 120 कर्मचाऱ्यांमार्फत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसह मशिन सज्ज करीत आहेत.

प्रत्येक मशिनवर एक हजार मॉक पोल

435 मतदान केंद्रांसाठी 435 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असणार आहेत तर 87 मशीन राखीव असणार आहेत. भंडारा विधानसभा मतदारसंघातील 435 मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन लागतील.

मशिन मॉक पोलकरिता रैंडम पद्धतीने निवडण्यात आल्या. प्रत्येक मशिनवर एक हजार मॉक पोल घेण्यात येणार आहे.

*अशी असते प्रक्रिया*

ईव्हीएम, हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया ही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते.

यात मतपत्रिका बॅलेट युनिटला लावून चेक करणे, प्रत्येक उमेदवाराला मतदान करून बघणे (मॉक पोल), मतदान आल्यानंतर व्हीव्हीपॅटच्या पावती आणि ईव्हीएम डेटा जुळवून बघणे, त्यानंतर कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट सील करून स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात येते.

प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान पथकाला मशिनचे वाटप केले जाते.

पोलिंग पार्टी 19 तारखेला रवाना

20 नोव्हेंबरच्या मतदानासाठी भंडारा विधानसभा क्षेत्रातील पोलिंग पार्टी 19 तारखेला रवाना होतील. भंडारा विधानसभा क्षेत्रात पवनी तालुक्यातील सावरला हे भौगोलिक दृष्ट्या सर्वात लांबचे मतदान केंद्र आहे.

बनवण्याची ही प्रक्रिया काल दिनांक 10 नोव्हेंबर पासून 12 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी दिली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here