अपक्ष उमेदवार हणमंतू मडावी यांच्या विजयीसाठी सिरोंचा तालुक्यात अनेक ठिकाणी कॉर्नर सभा

0
50

आविसं अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या हणमंतू मडावी यांना एक संधी देण्याची नागरिकांना विनंती

सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – अहेरी विधानसभा क्षेत्राचे आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार पुरस्कृत अपक्ष उमेदवार (भावी आमदार )हणमंतू मडावी यांच्या विजयीसाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक गावामध्ये कॉर्नर सभा घेऊन विजयी करण्याचे विनंती आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी गावो गावी फिरून कॉर्नर सभा घेत हणमंतू मडावी यांना मतदान करून विजयी करण्यासाठी विनंती करत आहेत.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी अपक्ष उमेदवर हणमंतू मडावी यांच्या प्रचारासाठी आज दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी सिरोंचा तालुक्यातील कोटा व पोचमपल्ली गावातील प्रत्येक वार्डात कॉर्नर सभा घेऊन अपक्ष उमेदवार हणमंतू मडावी यांना येत्या 20 नोव्हेंबर ला “रोडरोलर ” या बटन समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी कराव्या अशी नागरिकांना विनंती केले.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्याचा सर्वांगीण विकास पाहिजे असेल तर सामान्य व अनुभवी हणमंतू मडावी यांना एकदा संधी देऊन भरघोष मताने विजयी कराव्या असेही नागरिकांना विनंती केले. असून कोटा व पोचमपल्ली गावातील नागरिकांनी अपक्ष उमेदवार हणमंतू मडावी यांना पाठिंबा दर्शविले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here