prabodhini news logo
Home विदर्भ विदर्भ आदिवासीं टायगर सेनेचा विजय वडेट्टीवार यांना बिनशर्त जाहीर पाठींबा

विदर्भ आदिवासीं टायगर सेनेचा विजय वडेट्टीवार यांना बिनशर्त जाहीर पाठींबा

0
183

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

संपूर्ण विदर्भात आदिवासी समाजाच्या न्याय व हक्का करिता वेळोवेळी तन-मन-धनाने लढा उभारणार्‍या तसेच अनेक सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर असलेल्या विदर्भ आदिवासी टायगर सेनेकडून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार तसेच महाविकास आघाडी व घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय वडेट्टीवार यांना आज विदर्भ अध्यक्ष ॲड. संतोष कुळमेथे यांनी पत्राद्वारे बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

काँग्रेस पक्षाने नेहमीच आदिवासीं समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विविध सकारात्मक निर्णय घेतले आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाला जमिनीचे मूळ मालक म्हणून संबोधून प्रामाणिक आदिवासी समाजामध्ये नेहमी सहृदयता जपली आहे. काँग्रेस पक्षाचे आदिवासी समाजाबद्दलची सकारात्मक आदर भावना व आपुलकी बघून विदर्भाच्या कानाकोपऱ्यात आदिवासी समाजाचे न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली आदिवासी टायगर सेना विदर्भचे अध्यक्ष ॲड.संतोष कुळमेथे यांनी राज्यात आदिवासी समाजाची प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार तसेच महाविकास आघाडीचे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार विजय वडेट्टीवार यांना संघटनेकडून बिनशर् पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार संघटनेमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे स्वयंप्रेरणेने महाविकास आघाडी उमेदवार विजयी वार यांना निवडून आणण्यासाठी सर्व शक्तीने प्रयत्न करावे तसेच आदिवासी व सर्व समाजातील जनतेच्या हितासाठी उपरोक्त उमेदवारांनी कार्य करावे या अपेक्षेने आदिवासी टायगर सेनेकडून जाहीर समर्थन पत्र देत असल्याचे पत्रकात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here