prabodhini news logo
Home चंद्रपूर राज्यात परिवर्तनाची लाट…. महाविकास आघाडीचा विजय निश्चित -: विजय वडेट्टीवार

राज्यात परिवर्तनाची लाट…. महाविकास आघाडीचा विजय निश्चित -: विजय वडेट्टीवार

0
327

विजय वडेट्टीवारांच्या प्रचारार्थ सिने अभिनेता आफताब शिवदासानीचा व संजय खापरे यांचा सिंदेवाही, ब्रम्हपुरीत रोड शो

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

विधानसभा निवडणुक २०२४ च्या अंतिम टप्प्यात प्रचार सभेंचा शेवट आज रोड शो नी कऱण्यात आला.आज राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडी व घटक पक्षाचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्या प्रचारार्थ या रोड शो साठी आज हिंदी सिनेमा अभिनेता आफताब शिवदासानी व मराठी चित्रपट अभिनेते संजय खापरे यांनी हजेरी लावली.

आयोजित सिंदेवाही व ब्रम्हपुरी शहरातून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचार कार्यालयापासून पदयात्रा व बाईक काढण्यात आली. या रॅलीत सहभागी सर्व काँग्रेस पक्ष पदाधिकारी तथा महाविकास आघाडी घटक पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातून ढोलताशे, कलापथक तसेच मिरवणूक रथ व त्यावर स्वार विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि सिने अभिनेते रॅलीचे मुख्य आकर्षण होते. हि रॅली संपुर्ण शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण व प्रचार करीत आयोजीत रॅलीची सांगता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व सिने अभिनेते यांच्या भाषणाने प्रचार कार्यालयं येथे कऱण्यात आली.
यावेळी रॅलीला संबोधित करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, पक्ष फोडणाऱ्या भाजपने राज्यात जे असंविधानिक खोके सरकार स्थापन केली. त्या सरकारने राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, नौकरदार वर्ग व सर्वसामान्य यांचा विश्वासघात करून महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली. व उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ करून हीत जोपासत राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस आणली. यामुळे प्रचंड महागाई वाढून गोरगरिबांचे जगणे कठीण झाले आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण म्हणून १५०० रुपये देत दुसरीकडे खाद्यतील व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ करून हजारो रुपये वसूल केले जात आहे. राज्यातील २ लक्ष ५३ हजार महिला अद्यापही बेपत्ता असून महीला अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. भाजपच्या नितीन गडकरींनी मला रावण म्हटले. रामायणातील रावणाला ही मागे टाकणारे खरे बलात्कारी राक्षसांची फौज भाजपात आहे. अशा महिला भगिनींच्या अब्रुवर डोळा ठेवणाऱ्या नराधमांना भाजप पाठीशी घालून राज्य करीत आहे. व इतरांच्या चरित्रावर टीकाटिप्पणीचे षडयंत्रित राजकारण व कटकारस्थान भाजप करीत आहे. यांच्या पायाच्या खालची जमीन सरकली असून आता पराभव दिसू लागल्याने भाजपाकडून रडीचा डाव सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यांनी केली. तर रॅलीत सहभागी संख्या बघताही प्रचार रॅली नसून विजय रॅली असल्याचे ही ते म्हणाले.
तर सिने अभिनेता आफताब शिवदासानी व संजय खापरे यांनी उपस्थितांना आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. सिंदेवाही तसेच ब्रह्मपुरी येथे आयोजित रॅलीत स्वयं स्फूर्तीने हजारोंच्या संख्येने महिला भगिनी व नागरिक तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here