prabodhini news logo
Home ठळक बातम्या मतदानाचे राष्‍ट्रीय कर्तव्‍य पार पाडणा-या सर्व मतदारांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मानले...

मतदानाचे राष्‍ट्रीय कर्तव्‍य पार पाडणा-या सर्व मतदारांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मानले आभार

0
75

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – मतदान करून राष्‍ट्रीय कर्तव्‍य पार पाडल्‍याबद्दल जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांचे आभार व्‍यक्‍त केले आहे. लोकशाहीच्‍या या उत्‍सवात मतदारांनी हिरीरीने सहभाग घेवून लोकशाहीची मुल्‍ये अधिक सक्षम केली आहेत. जिल्‍हयात मतदानाची प्रक्रिया उत्‍तमरित्‍या पार पाडल्‍याबद्दल जिल्‍हा प्रशासन, पोलिस प्रशासनाचे देखील त्‍यांनी आभार व्‍यक्‍त केले आहे.

निवडणूक जाहीर झाल्‍यापासुन तर मतदानापर्यंत जिल्‍हयात वृत्‍तांकनाची प्रक्रिया समर्थपणे सांभाळणा-या प्रिंट व इलेक्‍ट्रॉनिक मिडीयाचे देखील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन व आभार व्‍यक्‍त केले आहे. निकोप राजकारणाची चंद्रपूर जिल्‍हयाची परंपरा सर्वांनीच जपली त्‍यामुळे लोकशाहीचा हा उत्‍सव चंद्रपूर जिल्‍हयात उत्‍तमरित्‍या संपन्‍न होवू शकला. या उत्‍सवातला प्रमुख घटक म्‍हणजे मतदार. लोकशाहीने आपल्‍याला दिलेला मौलिक अधिकार बजावत राष्‍ट्रीय कर्तव्‍य पार पाडणा-या प्रत्‍येकाचे विशेष आभार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केले आहे.

या निवडणूकीत मतदार बांधव विकासाच्‍या बाजुने कौल देतील अर्थातच भाजपा महायुतीला विजयी करतील असा विश्‍वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here