परभणी येथे झालेल्या संविधानाच्या विटंबने बाबत परिवर्तनवादी चळवळीचे मुख्यमंत्र्याना निवेदन.
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, सदरील घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस दलाने तात्काळ योग्य कारवाई करायला हवी होती.
मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली आहे,
पोलिसांनी संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे व त्याच्यावर देश द्रोहाचा गुन्हा करावा, भारतीय संविधानाची विटंबना ही लज्जास्पद बाब आहे. या पूर्वीही भारतीय संविधान आणि आंबेडकरी प्रतिकांचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झालेला आहे. या घटनेतील सर्व आरोपींना पोलिसांनी 24 तासांच्या आत तात्काळ अटक करावी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी,
आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
आरोपींना तात्काळ अटक करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील असे ठोस प्रयत्न करावेत, पोलीस प्रश्नाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीत पोलिसांकडे असलेल्या (लोखंडी रोड, दांडे)शत्र आले कुठून याची चौकशी करण्यात यावी व प्रकरणी दलितांच्या अटकेची आणि दलित वस्तीवर सुरू असलेल्या कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावे. असे या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना मागणी करण्यात आली.
या वेळी सुमेध खंडागळे रोहित साळवे, अभिमन्यु अंभोरे, सागर नरवडे, संघर्ष गायकडवाड, आदित्य रगडे अक्षय बनसोडे, अभय नवतुरे योगेश कांबळे शुभम मगरे,कुणाल दांडगे,कपिल चव्हाण, कमलेश दाभाडे आदी उपस्थित होते..

