मैदानी खेळातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होत असतो

0
49

केंद्रास्तरीय क्रिडा स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी जि. प.सदस्या पूजा हजारे यांचे प्रतिपादन

भंडारा जिल्हा प्रतिनिधी जयेंद्र चव्हाण 9665175674 – भंडारा – शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.जो प्राशन करील तो गुरगूरल्याशिवाय राहणार नाही.शालेय शिक्षणातून बौद्धिक विकास घडवून आपले जीवनमान उंचाविता येते.शालेय शिक्षणाबरोबर खेळांना सुद्धा अतिशय महत्व आहे.मैदानी खेळातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो.विद्यार्थ्यांनी सर्वच प्रकारच्या मैदानी खेळमध्ये सहभागी होऊन स्वतःचा सर्वांगीण विकास करून घ्यावा.त्याचप्रमाणे स्वतःबरोबरच आपल्या विद्यालयाचा नावलौकिक करावा असे प्रतिपादन पिंपळगाव ( निपानी ) जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या पुजाताई हजारे यांनी केले.

त्या अड्याळ केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसालवाडाच्या वतीने ( ता.20 ) ला तथागत विद्यालयाच्या प्रगनात आयोजित एक दिवसीय केंद्रास्तरीय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी शालेय विध्यार्थ्यांना उदघाटकीय मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केसालवाडा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल तवाडे हे होते.प्रमुख अतिथी अड्याळ पंचायत समिती पवनीचे साधन व्यक्ती संजय नंदूरकर,अड्याळ केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख रोशन ईळपाते,तथागत विद्यालयाचे मुखाध्यापक पद्माकर सावरकर,मुख्याध्यापक व्ही.एम.शेंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,पत्रकार जयेंद्र चव्हाण,सदस्या नंदा चंदनबावणे, वंदना माटे,वामिना फुंडे,सरपंच धनराज वलके,उपसरपंच भीमराव बारसागडे,सदस्य नांदेश्वर फुंडे,राजेश श्रीरामे (उच्च श्रेणी मुख्याध्यापक,उत्तर बुनियादी शाळा अड्याळ ),गणेश खोकले (उच्च श्रेणी मुख्यापक,जि. प.प्राथ.शाळा पिलांद्री ) आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उदघाटिका पूजा हजारे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटोचे पूजन करून ध्वजारोहन करण्यात आले.त्यानंतर शालेय विध्यार्थ्यांच्या क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेला सुरबत करण्यात आली.उदघाटकीय सत्राचे संचालन निलिमा बनसोड (सहा.शिक्षिका जि..प.प्राथ.शाळा सालेवादा )यांनी केले.तर आभार उत्तर बुनियादी शाळा अड्याळ येथील सहाय्यक शिक्षिका विद्या देशमुख यांनी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here