विविध उपक्रमांचे आयोजन ;आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
: सिंदेवाही तालुक्यातील
शिवणी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि ग्रामस्थांच्या विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने नुकतेच तीन दिवसीय विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामधे दैनिक ग्रामसफाई, रामधून, सामुदायिक ध्यान-प्रार्थना या कार्यक्रमासोबतच गावातील मंजुळामाता महिला भजन मंडळ, जय परसापेन आदिवासी महिला भजन मंडळ, दुर्गामाता महिला भजन मंडळ, सरस्वती महिला भजन मंडळ, भाग्यश्री महिला भजन मंडळ, श्री गुरुदेव आदिवासी भजन मंडळाच्या वतीने प्रबोधनपर भजनांचे सादरीकरण
करण्यात आले.
तसेच एच.सी.जी. हॉस्पिटल नागपूर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा यांच्या वतीने शिवणी येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी शेकडो लोकांची तपासणी करण्यात आली. डॉ. कमलजित कौर तसेच डॉ. हुमणे यांनी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले.
समारोपप्रसंगी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे राष्ट्रसंतांच्या साहित्यावर जाहीर व्याख्यान झाले. यावेळी गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होतेकार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष हेड़ाऊ , प्रा. आशिष शेंडे, रमेश हेडाऊ, भैय्याजी निकुरे, तुळशीदास ठाकरे, संदीप हजारे, अशोक बोरकर, गुरुदास ठाकरे तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळचे सर्व सभासद आदींनी सहकार्य केले.

