ब्रम्हपुरी येथे नाताळ सणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
विश्व निर्माता परमेश्वराने कुठलाही भेदभाव न करता सजीव सृष्टीची निर्मिती केली. मात्र आज समाजात फूट पाडण्याचे कट कारस्थान सुरू आहे. सर्वधर्म समभाव हीच परमेश्वराची खरी शिकवण असून माणुसकी हा खरा धर्म आहे. आम्ही मानव सेवेतून मानव धर्म निभावणारे असून सर्व समाजाला समान दर्जा देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता धडपडणारे लोकप्रतिनिधी आहोत. असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे ख्रिश्चन बांधवांच्या वतीने आयोजित नाताळ सण उत्सवाच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून बोलत होते.
आयोजीत नाताळ सण उत्सवा प्रसंगी मंचावर फादर डेव्हिड, ब्रह्मपुरी नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा गटनेता विलास विखार , सिंदेवाही महीला काँग्रेस शहराध्यक्ष प्रीती सागरे, व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यापुढें बोलतांना माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, मनुष्यावर जेव्हा संकट येते तेव्हा जात धर्मापलिकडे मानवताच कामी येते. आज नाताळ सनानिमिताने आपण सर्वांनी मला मान दिला व नेहमीच संपुर्ण समाजाने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य केले याचा मी सदैव ऋणी राहील. सोबतच नाताळ सणाच्या सर्वांना शुभेच्छा देत आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही देखील माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली.
आयोजीत कार्यक्रमास बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते. यावेळी आयोजकांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज केक कापून वाढदिवस साजरा केला.

