prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – अभिवादन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – अभिवादन

0
175

शब्दांच्या सौम्यतेतून
कार्य उभं राहिलं
आर्थिक सुधाराच
नव युग साकारलं…

देशाच्या प्रगतीस
दिला अखंड वसा
मनमोहन सिंग तुमचा
आदर्श अमूल्य असा…

देशहितासाठी तुम्ही
आयुष्य वाहिलं
नवा मार्ग दाखवत
उज्वल भविष्य घडवलं…

राष्ट्रनायक म्हणून
तुमचं नाव महान
तुमचं स्मरण हेच
आमचं भाग्यदान…

निर्मळ व्यक्तिमत्त्व
प्रामाणिक विचार
तुमच्या हातून घडला
देशाचा उत्थानाचार…

मनमोहन सिंग आहेत
प्रेरणा भारतासाठी
तुमची आठवण ही
आमच्या कर्तृत्वासाठी…

देशाच्या प्रगतीचा
तुम्ही घेतला ध्यास
अर्थव्यवस्थेला दिला
नवीन तो प्रकाश..

गव्हर्नर मनमोहन सिंग
तुम्हाला आमचे वंदन
तुमच्या कार्यासाठी
शतशः करते अभिवादन…

कवयित्री संध्या रायठक/धुतडे
शिक्षिका, नांदेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here