prabodhini news logo
Home चंद्रपूर अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या वार्षिक विशेषांकाचे ऊर्जानगरात विमोचन

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या वार्षिक विशेषांकाचे ऊर्जानगरात विमोचन

0
71

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या २०२४ च्या वार्षिक विशेषांकाचे विमोचन चंद्रपूर विज केंद्र कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सचिव मा.चेतन वानखेडे, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष मा. नरेंद्र रहाटे, कामगार मनोरंजन केंद्राचे अध्यक्ष मा. नंदकिशोर धडांगे,महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.पी. एम. जाधव, प्रधान सचिव मा. नारायण चव्हाण, ऊर्जानगर शाखेचे कार्याध्यक्ष देवराव कोंडेकर, महिला विभागाच्या प्रमुख कविता नवघरे ,जिल्हा युवा कार्यवाहक किसन अरडळे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती ऊर्जानगर शाखेच्यावतीने आयोजित कामगार मनोरंजन केंद्र येथील कार्यक्रमात पी .एम. जाधव यांनी आळंदी येथील तीन दिवसीय अधिवेशनाचा वृत्तांत कथन केला. ऊर्जानगर शाखेने जाहिरातदार, देणगीदार व वर्गणीदार मिळून ९० चे वर वर्गणीदार केल्याबद्दल ऊर्जानगर शाखेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे जाधव यांनी अभिनंदन केले. या प्रसंगी चेतन वानखेडे, नरेंद्र रहाटे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव कोंडेकर केले तर दुरेंद्र गेडाम यांनी आभार मानले.यावेळी ऊर्जानगर शाखेचे पदाधिकारी मा.दुरेंद्र गेडाम,विजय राठोड,शंकर दरेकर,संजय जुनारे,सिद्धार्थ चिमुरकर,सुरेंद्र इंगळे,मनिष पाटील,विजय भोयर,गजानन गायकवाड,संतोष ताजने,अनिल दौडकर,हेमंत झाडे,हरिदास बोरकर,पांडुरंग बोबडे इत्यादिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here