
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, पहेला येथे वार्षिक स्नेहसंमेलन दिमाखात साजरे करण्यात आले. या प्रसंगी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. आनंद जिभकाटे यांनी भूषवले, तर उद्घाटन जिल्हा पुरवठा अधिकारी मा. नरेश वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मंगला ठवकर, उपाध्यक्ष नरेंद्र कावडे, माजी मुख्याध्यापक आर. जे. वाघमारे, डी. जी. कटेखाये, विश्वस्त देवानंद चेटूले आणि ओमप्रकाश वैद्य, माजी विश्वस्त नरेश जिभकाटे, पोलिस पाटील चंद्रशेखर खराबे, तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष देवचंद हजारे उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक मा. योगेंद्र काटेखाये यांनी केली. यावेळी कलाप्रदर्शनी व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पी. वाय. काटेखाये आणि अजय चकोले यांनी कौशल्याने पार पाडली, तर आभार प्रदर्शन प्रा. विनोद हटवार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, आणि विद्यार्थ्यांच्या कलेचे प्रदर्शन यामुळे कार्यक्रम लक्षवेधी ठरला.
गांधी विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाने उपस्थितांवर छाप पाडली, तसेच विद्यार्थ्यांना आपली कला आणि ज्ञान सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले.














