प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – घर म्हणजे फक्त भिंती नाहीं तर तो असतोय आपल्या हक्काचा निवारा!,सुख-दुःखात जिवन जगण्याचं निवासस्थान म्हणजे आधारस्तंभ!
पण,अलिकडच्या काळात माहागाईने एवढा उच्चांक गाठला आहे की,स्वतःच्या हक्काचे घर सुध्दा बांधने मुश्किल झाले आहे.तद्वतच महागाईच्या झळानी हे स्वप्न आता धूरीश झाले झाले असून दूरवर पळत चालले असल्याची खंत युवा कार्यकर्ता शुभम गजभिये यांनी व्यक्त केली आहे.
सिमेंट,लोखंड,विटा,वाळू यासारख्या वस्तूंच्या किमती गनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
आमचा हक्काचा घर कधी होईल? हा प्रश्न आज ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक कुटुंबियांना भेडसावतो आहे.याचबरोबर स्वतःचे घर न होण्याने डोळ्यात अस्वस्थतेचं पाणी सातत्याने असतय.
गेल्या काही महिन्यात महागाईमुळे घर बांधणीचा खर्च झपाट्याने वाढला आहे.सिमेंट,लोखंड,वाळू,विटा,लाकूड आणि इतर बांधकाम साहित्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न धुसर होत आहे.
ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत माहागाई वाढीचा परिणाम सर्वत्र जाणवत असून घर बांधकामे ठप्प होण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या काही वर्षात सिमेंटच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.प्रति बॅग,२७० रुपयावरून ३४० रुपयावर पोहचली आहे.याचा थेट परिणाम घर बांधणीच्या खर्चावर होतो.वाळू आणि विटा या दोन्ही साहित्याचे दर झपाट्याने वाढत आहेत.
वाळू साडेचार हजार रुपये प्रतिब्रास वर पोहचली आहे तर विटांचा दर हजाराला ७ हजार रुपयांवर पोहचले आहे.जो आधी ५००० हजार रुपये होता.
दरवाजे,खिडक्या आणि आतील सजावटीसाठी लागणाऱ्या लाकडाच्या किमतीत दीडपट वाढ झाली आहे.घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबावर आणि शेतकऱ्यावर या महागाईचा मोठा परिणाम झाला आहे.
ग्रामीण भागात घर बांधणीचे प्रमाण कमी होत आहे.अनेक कुटुंबे घर बांधण्या ऐवजी भाड्याच्या घरामध्ये राहणे पसंत करत आहेत.
ज्यांची जुनी घरे आहेत ते लोक घराचे रिन्यूएशन पुढे ढकलत आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे.वाळू,विटा आणि लोखंड यासारख्या साहित्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
यामुळे गोरगरिबांच्या संबंधाने स्वतःच्या घराची वास्तविकता यापुढे स्वप्नच राहणार काय?हा प्रश्न युवा सामाजिक कार्यकर्ता शुभम गजभिये यांनी शासन-प्रशासनाला उद्देशुन केला आहे आणि घर बांधकामाची वास्तविकता समाजा पुढे आणली आहे.

