prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्रम्हपूरी येथील पोदार स्कुलला क्रिकेटर मोहम्मद अझरूद्दीन यांची ग्रेट भेट

ब्रम्हपूरी येथील पोदार स्कुलला क्रिकेटर मोहम्मद अझरूद्दीन यांची ग्रेट भेट

0
158

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अझरूद्दीन मोहम्मद यांनी नुकतीच ब्रम्हपूरी येथील पोदार लर्न स्कुलला भेट दिली आहे.
यावेळी त्यांनी स्कुलमधील विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधत गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनातील प्रश्न त्यांना विचारले तेव्हा हसतखेळत दिलखुलासपणे त्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. सोबतच क्रिकेट खेळून त्यांनी क्रिकेटचा देखील आनंद घेतला. स्कुलच्या संदर्भात माहिती देखील त्यांनी जाणुन घेतली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रिकेटर मोहम्मद अझरूद्दीन म्हणाले की, विद्यार्थ्यांनी खेळा सोबतच शिक्षणातही जिद्द चिकाटी व कसोशीने मेहनत घ्यावी. प्रत्येकाने यशाच्या मागे न ठेवता यश मिळविण्याची पात्रता आपल्या अंगी प्राप्त करून यशाचे शिखर गाठावे. आज स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकायचे असेल तर शिक्षणाने सामर्थ्यवान होणे अत्यंत गरजेचे असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या देशाचा स्वाभिमान व अभिमान राखण्यासाठी प्रत्येकाने देशभक्ती अंगीकारून विविध क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करावे असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, स्कुलचे मुख्य संचालक, आमदार विजय वडेट्टीवार, स्कुलचे संचालक डॉ. नितीन उराडे, वैशाली उराडे, मुख्याध्यापक प्रवीण ढोले, प्रशांत उराडे, विनय उराडे, प्रशासकीय अधिकारी अजय पाटील यांसह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here